हरभरा डाळीच्या पीठाची बर्फी

0
153

हरभरा डाळीच्या पीठाची बर्फी

साहित्य : पीठ हरभरा डाळीचे दीड
कप, तेल मोहनासाठी दोन चमचे, दूध पाव
कप अधिक एक चमचा, तेल तळण्यासाठी एक
कप, साखर एक कप, पाणी अर्धा कप, तूप
एक तृतीयांश कप, वेलदोडेपूड अर्धा चमचा,
चारोळी एक चमचा.
कृती : पीठात मोहन घालून दूधात
भिजवावे. त्याची मुटकुळी करावी. कढईत
तापल्या तेलात ती गुलाबी तळून खलबत्यात
कुटावीत रव्याच्या चाळणीने ते पीठ चाळावे.
तो रवा तुपात मंद विस्तावावर गुलाबी
भाजावा. साखरेचा दोनतारी पाक करून भांडे
खाली उतरवून त्यात हा रवा घालून घोटावा.
वेलदोड्याची पूड घालावी. ताटाला तूप
लावून त्यावर मिश्रण पसरावे. वरून चारोळी
पसरून दाबावी. कापून कोमट असतानाचे
काढाव्यात.