एमआयडीसीजवळ अपघात; अनोळखी वृध्दाचा मृत्यू

0
27

नगर – नागापूर एमआयडीसीतील गरवारे चौकात अपघातात एका अनोळखी ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गरवारे चौकात एका ६० वर्षीय अनोळखी पुरूषाचा अपघात झाल्याने त्यास खासगी रूग्णवाहिकेतून शनिवारी (दि.८) सकाळी ९.५७ वाजता जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, ते मयत झाले असल्याचे तेथील डॉटरांनी तपासणी करून घोषित केले. तशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांनी रुग्णालयात नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार जठार यांना दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत वृध्दाची ओळख पटली नसून त्यांना कोणत्या वाहनाने धडक दिली हे देखील समोर आलेले नाही. अधिक तपास पोलीस अंमलदार दिवटे करत आहेत.