सकल माळी समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी किशोर डागवाले, उपाध्यक्षपदी बाळासाहेब भुजबळ, सचिवपदी राजेंद्र पडोळे यांची निवड
नगर – संत शिरोमणी सावता महाराज यांचा श्रम प्रतिष्ठेचा संदेश घेऊन व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा समतेचा विचार घेऊन माळी समाजाची वाटचाल सुरू आहे. सकल माळी समाजाच्या कामाला सुरुवात होवून एक वर्ष पूर्ण होत आहे. समाजाने जो अजेंडा ठरविला होता त्यातील काही कामे पूर्णत्वास येण्याची सुरुवात झाली आहे. सकल माळी समाज एकत्रित आल्याने आदर्शवत असे काम नगर शहरात उभे राहील. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेकडून जागा मिळाली आहे. तसेच सारस नगरचे सावित्रीबाई फुले नगर नामकरण कमानीचे काम प्रगती पथावर आहे. तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचेही काम लवकरच पूर्ण होईल. यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक व प्रशासन यांचे सहकार्य लाभले आहे. यापुढील काळात सकल माळी समाजाचे वतीने अद्ययावत हॉस्पिटल, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व बहुउद्देशीय सभागृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन सकल माळी समाज ट्रस्टचे नूतन अध्यक्ष किशोर डागवाले यांनी केले आहे. तारकपूर येथील हॉटेल व्ही स्टार येथे सकल माळी समाज ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त अनिल बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीत किशोर डागवाले, उपाध्यक्षपदी बाळासाहेब भुजबळ, सचिवपदी राजेंद्र पडोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, जि.प.सदस्य शरद झोडगे, प्रा.माणिकराव विधाते, अर्जुन बोरुडे, संतोष म्हस्के, संजय गारुडकर, प्रा.सुनील जाधव, सुरेश आंबेकर, डॉ.रणजित सत्रे, विनोद पुंड, प्रकाश शिंदे, अनिल इवळे, अमोल भांबरकर, डॉ. दामोधर कळमकर, डॉ.कैलास मेहेत्रे, नितीन भूतारे, अॅड.राहुल रासकर, जालिंदर बोरुडे, गजानन ससाने, परेश लोखंडे, कॅप्टन सुधीर पुंड, रोहित पठारे, चंद्रकांत पुंड, अभिजित चिपाडे, साहेबराव विधाते, संभाजी चौधरी, भास्कर चौधरी, नितीन डागवाले, विष्णु पाबळे, भाऊसाहेब कोल्हे, अशोक हिंगे, गणेश कोल्हे, निलेश चिपाडे, लवेश गोंधळे, संजय ताजणे, सुधाकर कानडे, दीपक खेडकर, बाबासाहेब दळवी, रामदास फुले, कुंडलिक गदादे, लक्ष्मण शिंदे, ब्रिजेश ताठे, मनोज भुजबळ, राजु खरपुडे, बाळासाहेब गायकवाड, संजय कानडे, गिरीश रासकर, रमेश चिपाडे, सदाशिव धाडगे, बाळासाहेब इवळे, विनायक नेवसे, अनंत गारदे, सागर फुलसौंदर, मुकेश झोडगे, निखिल शेलार, प्रसाद शिंदे, ऐश्वर्या गारदे, डॉ.योगिता सत्रे, रोहिणी बनकर, रेखा विधाते, प्रणल गारुडकर, रेणुका पुंड, सुष्मा पडोळे उपस्थित होते. प्रा. माणिक विधाते म्हणाले, समाज संघटित झाल्यामुळे समाजाच्या हिताच्या दृष्टीने चांगली कामे होत आहेत. माळीवाडा वेस येथे लवकरच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
शरद झोडगे म्हणाले,समाजाचे संघटन करीत असताना जो व्यक्ती ज्या विषयात पारंगत आहे ते क्षेत्र त्याला द्यावे. तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी समाजासाठी आर्थिक योगदान द्यावे. बाळासाहेब बोराटे म्हणाले, नूतन कार्यकारणीत ज्यांची निवड झाली आहे त्यांचे अभिनंदन. तसेच सकल माळी समाजाच्या भविष्यातील शासकीय कामकाजासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणार असून समाजाच्या हिताच्या दृष्टीने सर्व होतो सहकार्य करणार आहे.असे सांगितले. संजय गारुडकर म्हणाले, लग्न जमविणे सध्याच्या काळात अवघड झाले आहे.समाजासाठी वधूवर मेळावा घेण्याची गरज आहे. अनिल बोरुडे म्हणाले, सकल माळी समाजाने एकत्रित येऊन समाज हिताच्या दृष्टीने चांगले पाऊल उचलले आहे. यातून समाजाची नक्कीच उन्नती होईल. समाजाच्या विकासासाठी नेहमी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी सकल माळी समाजाचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविकात बाळासाहेब भुजबळ यांनी सकल माळी समाज ट्रस्टच्या नूतन कार्यकारिणीचे वाचन केले. सूत्रसंचालन राजेंद्र पडोळे यांनी केले तर आभार विनोद पुंड यांनी मानले.