४ जून, तयारी जन जल्लोषाची … आनंदोत्सव नवनिर्वाचित खासदारांचा…

0
31

खोट्याने खोट्याचे ढोल बडविले तर त्यास सत्याचे स्वरूप येत नाही तसेच सत्याला कितीही खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक परिक्षेतून ते तावून सुलाखून अधिक तेजाने चमकते यात तिळमात्र शंका नाही. फक्त अग्निपरिक्षेस त्याला सामोरं जावं लागतं. १० वी व १२ वी गुणवंतांच्या पालक वर्गाने गुणवंताचा जल्लोष साजरा केला. आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे ४ जूनच्या लोकसभेच्या निकालाची. अहमदनगरचा नवनिर्वाचीत खासदार कोण होईल, कमळ उमलेल की तुतारी वाजेल हे उद्या स्पष्टच होणार आहे. आपल्या नविन खासदाराकडून अहमदनगरच्या जनतेला याच अपेक्षा असतील की दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या जिल्ह्यास पाणीप्रश्न, रोजगाराच्या संधी औद्यागीक क्षेत्राचा विकास, उद्योगधंदे, आयटीपार्क, दळवळणाच्या सुविधा, रस्ते, महामार्ग आणण्यासाठी लोकसभेत जनतेचा आवाज उठविणारा पाहीजे.

उद्या निकाल लागेल, कुणाचे ढोल वाजतील, कुणाचे वाजून वाजून फुटतील किंवा कुणाचे वाजण्याच्या आधी फुटतील हे अहमदनगरच्या मतदार राजास दिसेलच? आणि हेच या छायाचित्रातून दिसत आहे. खणानना खणखणा… हो झणानना झणझणा है ढोली तारे ढोल बाजे… ढोल बाजे… ढोली तारे ढोल बाजे ढोल… धरणी और गगन धरती संग नाचे अरे रंगीन गुलाल होगा, रंगीन लोग होगे, रंगीन जश्न होगा.