पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी

0
29

अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त शिवसेनाच्यावतीने अभिवादन

नगर – आपल्या असामान्य कर्तुत्वाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. त्या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतातील अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले तर काहींचा जिर्णोद्धार केला. त्यांनी समाजातील अनेक अनिष्ठ रुढी परंपरांना विरोध करुन रयतेत जागृती निर्माण केली. स्त्रीयांना मानाचे स्थान मिळवून दिले. अहिल्यादेवी या एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ एक स्वप्नवत होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्या काळात जनतेची भरभराट झाली. आजही त्यांनी निर्माण केलेल्या वास्तू सुस्थितीत आहेत. त्यांचा आदर्श हा सर्वांसाठी आजही प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श घेऊन आपण कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (ठाकरे गट)च्यावतीने शिवालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, शाम नळकांडे, योगीराज गाडे, संतोष गेनप्पा, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, सुरेश क्षीरसागर, अंबादास शिंदे, डॉ.श्रीकांत चेमटे, मुन्ना भिंगारदिवे, विकी पवार, सुनिल भोसले, आनंद राठोड, संदिप दातरंगे, शरद कोके, जेम्स आल्हाट, गौरव ढोणे, पप्पू भाले, जिगनेश जग्गड, राजू ढोरे, संजय सागावकर, अक्षय नागापुरे, सभाजी राहिंज, वैभव सावेकर, उमेश काळे आदि उपस्थित होते. याप्रसंगी संजय शेंडगे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेले कार्य फार मोठे आहे. त्यांनी किल्ले, रस्ते, अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरुपी पूजा सुरु रहावी म्हणून अनेकांना मदत केली. अनेक मंदिरे, घाट, विहिरी, तलाव धर्मशाळा बांधल्या. मराठा साम्राज्यात त्या तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जातात. आजच्या स्त्रीयांसाठी त्यांचे कार्य दिशादर्शक असेच आहे. महिला उद्धाराक अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी या कायम आपल्याला मार्गदर्शक राहतील, असा विश्वास व्यक्त केला.