लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
112

नगरमधील तरुणाविरुद्ध अत्याचारासह पोसोचा गुन्हा दाखल

नगर – नगर शहरात राहणार्‍या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून छत्रपती संभाजी नगर रोडवरील इमामपूर घाटातील लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि.२९) दुपारी घडली. याबाबत पिडीत मुलीने रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी आदिनाथ लोंढे (रा. भराट गल्ली जवळ एका होस्टेल मध्ये) याच्या विरुद्ध अत्याचारासह पोसो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर पिडीत मुलीची आरोपीसोबत ओळख झाली होती. त्याने तिला फिरायला जावू असे म्हणत त्याच्या बुलेट गाडीवर इमामपूर घाटात नेले व तेथे एका लॉजवर नेवून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला. ही बाब तिने कुटुंबियांना सांगितल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिला पोलिस ठाण्यात नेले. तेथे तिने याबाबत फिर्याद दिली.