पत्रकार चौक ते प्रेमदान दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजवून अतिक्रमणांवर कारवाई करावी

0
26

अन्यथा रस्ता रोको आंदोलन करणार : शिवसेनेचा निवेदनाद्वारे इशारा

नगर – पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यानचे धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत व अतिक्रमण हटवावीत अन्यथा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. यासंदर्भात शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत (काका) शेळके यांनी कार्यकारी अभियंता (जागतिक बँक प्रकल्प) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अत्यंत रहदारीच्या अशा पत्रकार चौक ते प्रेमदान चौक रस्ता दरम्यान अनेक मोठ मोठे खड्डे पडलेले असुन त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक करणार्‍या नागरीकांना त्रास होत आहे. अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे सदर खड्यांमुळे अनेक लोकांना आज पर्यत आपला जीव गमवावा लागला आहे त्यातच भर म्हणुन या रस्त्यालगत दरम्यान रोड लगत अनेक छोटे मोठे अतिक्रमण वाढलेले आहे या मुळे रस्त्या लगत गाडी पार्क करणे जीकीरीचे झाले आहे म्हणजेच शहरातल्या या रस्त्यावर वाहतुकीचा श्वास गुदमरला आहे.

अशा सगळ्या बीकट परिस्थीतीत येथुन रहदारी करणार्‍या वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे याचाच परिपाक म्हणुन बर्‍याचशा नागरीकांचा अपघाती मृत्यु होत आहे तर काहींना कायम स्वरुपाचे अपंगत्व येत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यावर शहराची परिस्थीती बीकट होणार आहे. सदर सर्व बाबींचा आपण गांभीर्याने विचार करावा व पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यानचे अतिक्रमणे हटवावेत व रस्त्यावरील खड्डे बुजवावे जेणेकरुन भविष्यात लोकांचे प्राण वाचतील. पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यानचे सर्व छोटे मोठे अतिक्रमणे काढावीत व सर्व खड्डे बुजवावे जर १५ दिवसात ही कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने हायवे वर रस्ता करण्याचा इशारा चंद्रकांत शेळके यांनी दिला आहे. यावेळी अनिकेत कराळे, प्रा.विशाल शितोळे, मयुर गायकवाड, रविंद्र राऊत, तुषार यादव, अमोल बगाडे, अनिकेत ओझा उपस्थित होते.