व्हेरिकोज व्हेनच्या रुग्णांनी आपल्या आजाराकडे दुर्लक्ष न करत उपचार करून घ्यावे : डॉ. हेमंत चौधरी

0
68

नगर – धकाधकीच्या जीवनामध्ये व्हेरिकोज व्हेनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे सर्वसामान्यांना उपचार मिळावेत यासाठी डॉ. पानसरे चेस्ट लिनिकच्या माध्यमातून हेरिकोज व्हेन लेझर उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या उपचार शिबिरात नगर पुणे बीड लातूर येथील ३०० रुग्णांनी घेतला लाभ घेतला. व्हेरिकोज व्हेनच्या रुग्णांनी आपल्या आजाराकडे दुर्लक्ष न करत उपचार करून घ्यावे, असे आवाहन रक्तवाहिनी स्पेशलिस्ट डॉ. हेमंत चौधरी यांनी केले. डॉ. पानसरे चेस्ट लिनिक येथे हॉटेल ओबेराय, मीरा मेडिकल शेजारील साईड येथे आयोजित पुणे येथील रक्तवाहिनी स्पेशलिस्ट डॉ. हेमंत चौधरी यांच्या व्हेरिकोज व्हेन लेझर उपचार शिबिराचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

डॉ. पानसरे चेस्ट लिनिकच्या वतीने व्हेरिकोज व्हेन लेझर उपचार शिबिरात ३०० रुग्णांनी घेतला लाभ

यावेळी डॉ. सचिन पानसरे, डॉ. रणजित सत्रे यांच्यासह रुग्ण उपस्थित होते. पोपटराव पवार म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य सुविधेत बदल झाले असून सर्व सामान्य रुग्णांना उपचार मिळावे यासाठी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन होणे गरजेचे आहे, आता पुणे मुंबई येथील आरोग्य सुविधा नगरमध्ये उपलब्ध झाल्या आहेत, रक्तवाहिनी स्पेशलिस्ट डॉ.हेमंत चौधरी हे व्हेरिकोज व्हेन या आजारावर योग्य ते उपचार करत असून त्यांनी नगर शहरात शिबिराचे आयोजन करून रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.