विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ट्रस्टचा नेहमीच पुढाकार : अध्यक्ष प्रसाद शिंदे

0
65

तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

नगर – शिक्षणातून मुला-मुलींचे भविष्य घडत असते. हे शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. मुलांना शिक्षण घेतांना अडचणी येऊ नये यासाठी तिळवण तेली समाज ट्रस्टने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. उच्च शिक्षणासाठीही ट्रस्ट सहाय्य करत असते. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना ट्रस्टच्यावतीने वह्याचे वाटप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनीही चांगला अभ्यास करुन आपल्या कुटूंबाचे व समाजाचे नाव उज्वल करावे. मुलांचे उज्वल भविष्यासाठी ट्रस्टचा नेहमीच पुढाकार राहिला आहे, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी केले. तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीनेे संत शिरोमणी संताजी महाराज शैक्षणिक योजने अंतर्गत समाजातील इ.१ ली ते इ. १२ वी तील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे मोफत वह्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी हभप रामदास महाराज क्षीरसागर, ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे, उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, खजिनदार प्रकाश सैंदर, सचिव शोभना धारक, विश्वस्त सागर काळे, गोकूळ कोळकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, निता लोखंडे उपस्थित होते.

याप्रसंगी सागर काळे म्हणाले, तिळवण तेली ट्रस्टच्यावतीने दरवर्षी इ.१ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत असते. यंदाही विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा शुभारंभ नुकताच झाला असून, ५ जुनपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. विद्यार्थांनी गुणपत्रक, आधारकार्डची झेरॉस जमा करुन आपल्या वह्या दाळ मंडई येथील ट्रस्टच्या कार्यायातून दु.३ ते ५ या वेळेत घेऊन जाव्यात, असे आवाहन केले. सूत्रसंचालन निता लोखंडे यांनी केले तर आभार दत्तात्रय डोळसे यांनी मानले. ट्रस्टच्यावतीने आजपर्यंत उत्तम दर्जाच्या सुमारे १४,७०० वह्यांचे वाटप केले असून, यंदाही मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. माहितीसाठी मो. ९२६१२१७७७७, ९८६०५६२९२ या क्रमांकवर संपर्क साधावा.