ड्रेनेजचे मैलमिश्रित पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी

0
26

लाईन दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांची मनपा आयुक्तांकडे धाव

नगर – वार्ड क्रमांक ४ मधील गौरवनगर फकीरवाडा येथून मोठी ड्रेनेज लाईन गेलेली आहे. ती ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत आहे व तुंबल्यानंतर त्यातील मैलमिश्रित पाणी सर्व रस्त्यावरून नागरिकांच्या दारातून वाहत आहे. या वार्डच्या विभागीय कार्यालयात वारंवार तक्रारी केल्या आहे. परंतु तक्रार केल्यानंतर सफाई कामगार तात्पुरती पट्टी टाकून पाण्याला वाट करून देतात आणि परंतू पुढील ६ ते ७ दिवसात पुन्हा ड्रेनेज लाईन पॅक होते. पुन्हा मैलमिश्रित पाणी नागरिकांच्या दारातून वाहते त्यामुळे येथे संपूर्ण दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून घरातील लहान मुले वृद्ध सतत आजारी पडत आहेत. त्यामुळे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गौरवनगर फकीरवाडा येथील ड्रेनेज लाईनचे काम त्वरित चालू करण्याच्या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना देण्यात आले. यावेळी संघटनेच्या महिला जिल्हाअध्यक्षा सुरेखाताई सांगळे, गिरीश मुळे, पूनम शेलार, नागनाथ कासार, सोनाली शेलार, सना शेख, राम चिंचोळी, नईम सय्यद, संगीता केरूळकर, सोनाली मुनोत, प्रदीप कारंडे, मझहर अली, सुनिता साळी, रिजवान पठाण, शोभा घाडगे, पुष्पा शिंदे आदीसह प्रभागातील महिला उपस्थित होत्या.