ग्राहकांनी ३१ मे पर्यंत केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन होणार बंद

0
53

नगर – गॅस कनेशनधारकांना केवायसी करण्यासाठी वितरकांकडून आवाहन केले जात आहे. मात्र, केवायसीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. अनेकांची केवायसी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत असून, केवायसी न केल्यास गॅस कनेशन बंद होणार असल्याची शयता गॅस एजन्सी चालकांनी वर्तविली आहे. त्यामुळे लवकर गॅस सिलिंडरधारकांनी ई केवायसी करणे आवश्यक आहे. नगर शहर आणि परिसरातील वितरकांकडे ३१ मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. सर्वच गॅसधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न करणार्‍या नियमित ग्राहकांना तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅस कार्डधारकांना ३०० रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद केली जाणार आहे. ग्राहकांचे गॅस कनेशनही बंद केले जाणार आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सर्व ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी, असे आवाहन आनंद गॅसचे विवेक मुनोत व प्रिया मुनोत यांनी केले आहे.

एजन्सीमध्ये केवायसीची सोय

गॅस सिलिंडरधारकांनी एजन्सीमध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी. त्यासाठी आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, गॅस जोडणी ग्राहकांचे पुस्तक, ग्राहकांचे फेस रीडिंग किंवा थम्ब, हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केवायसी झालेल्या ग्राहकांची माहिती कंपन्यांकडे उपलब्ध असून अनेक कोर्डधारकांची केवायसी अजून बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकाच नावावरचे कनेशन होणार रद्द

ग्राहकांना एजन्सी कार्यालयात जाऊन केवायसी करता येणार आहे. यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांची काही बंधने नसल्याने गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता; परंतु आता केवायसीसाठी कडक निर्बंध लावल्याने केवायसी शिवाय ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही. याशिवाय एकाच पत्त्यावर आणि एकाच नावावर असेलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे कनेशन रद्द करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.