पद्मउद्योजक शॉपिंग महोत्सवाने समाजातील महिला नवउद्योजकांमध्ये चैतन्याचे वातावरण

0
41

नगर – कष्टकरी विड्या वळण्याचे काम करणारा समाज अशी ओळख असणार्‍या सम ाजतील काही माता भगिनीं, युवक मित्रांच्या पुढाकारातून गेल्या तीन वर्षापासून सुरू झालेल्या या शॉपिंग महोत्सवातून समाजातील महिला नवंउद्योजकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण आहे. पहिल्या तीन पर्व तून अनेक महिलांना व्यवसाय, उद्योग उभारण्याची प्रेरणा मिळाली आहे. समाजाच्या कुठल्याही कामासाठी आम्ही कायम उपलब्ध आहोत, कधीही हाक द्या, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. श्री मार्कंडेय संकुल येथे पद्मशाली युवा शक्ती संचलित पद्मशाली महिला शक्ती आयोजित ’पद्मउद्योजक शॉपिंग महोत्सव २०२४’ च्या उद्घाटन प्रसंगी आ. संग्राम जगताप बोलत होते. हा शॉपिंग महोत्सव २३ ते २६ मे पर्यंत चालणार आहे.

प्रास्ताविकात माजी नगरसेविका सुरेखा विद्ये म्हणाल्या की, हे पद्मउद्योजक परिवाराचे चौथा पर्व आहे, पहिल्या तीन पर्वला नगरकरांच्या मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर वर्षभर विविध माध्यमातून सक्रिय असणार्‍या पद्मशाली युवा शक्ती, पद्मशाली महिला शक्तीच्या वतीने या चौथ्या पर्वाचा आयोजन केले गेले आहे. चित्रकला, रिल मेकिंग व नृत्य स्पर्धा, लकी ड्रॉ असा चार दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे, समस्त नगरकरांनी शॉपिंग महोत्सवाला सहकुटुंब भेट देऊन खरेदी बरोबर पेटपूजेचा आस्वाद घ्यावा, त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमात किचन क्विन पारितोषिक मिळाल्या बद्दल सौ. रेणुका जिंदंम् यांचा सन्मान करण्यात आला. यु पि एस सी द्वारे नवीन नियुक्त पोलीस उपनिरीक्षक अनिल अलवाल, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून विमान उड्डाण अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल अमोल कोंडा यांचा सन्मान करण्यात आला.

पद्मशाली युवा शक्ती संचालित ’पद्मउद्योजक शॉपिंग महोत्सवा’चे उद्घाटन

सोहम अकॅडमी मधील अंश नुती, सोहम म्याकल, नीरज गरदास, रितेश नुती, प्रज्वल कोपला या पाच विद्यार्थी राज्यस्तरीय मल्लखांबसाठी निवड झाल्या बद्दल यांचा सन्मान करण्यात आला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये कथ्थक नृत्याचा अवीष्कार केल्याबद्दल पूर्वजा श्रीनिवास बोज्जा यांचा सन्मान करण्यात आला तसेच महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल बालाजी वल्लाळ यांचा सन्मान करण्यात आला. माजी यावेळी व्यासपीठावर नगरसेवक मनोज दुलम, माजी नगरसेवक धनंजय जाधव, स्वामी समर्थ प्रतिष्ठान अध्यक्ष संदीप दातरंगे, प्रकाश कोटा, माजी नगरसेवक किशोर डागवाले, अभिजित खोसे, सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक वीणा बोज्जा, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे शरद यादर, संचालक राजू म्याना, माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम, सविता कोटा, मार्कंडेय नागरी सहकारी पतसंसंस्थेचे चेअरमन नारायण कोडम, एस राज टेलर्सचे संचालक गिरीश सुंकी, अहमदनगर फटका असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम, राजेंद्र विद्ये, क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या अनिता कोंडा आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्रीनिवास एल्लारम यांनी केले तर आभार वैशाली कुरापट्टी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा शक्तीचे अजय म्याना, दीपक गुंडू, सुमित इप्पलपेल्ली, सागर बोगा, सागर आरकल, विशाल गाजुल, श्रीनिवास इप्पलपेल्ली, योगेश म्याकल, योगेश ताटी, सुनंदा रच्चा, लक्ष्मी म्याना, उमा बडगू, नीता बल्लाळ, सुनंदा नागुल, रेणुका जिंदम, वैशाली कुरापटी, सारिखा सिद्दम, सविता येनगंदूल, सुरेखा कोडम, स्मिता मंगलारप यांनी परिश्रम घेतले.