श्रीनाथ मल्टीस्टेटच्या संचालकांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचे लिलाव करुन ठेवीदारांचे पैसे द्यावे

0
21

जिल्हा न्यायालयाचा आदेश

नगर – जिल्ह्यातील अनेक गोरगरीब ठेवीदारांची फसवणुक करणार्‍या श्रीनाथ मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या संचालकांच्या चाळीस मालमत्ता यापुर्वीच शासनाने जप्त केलेल्या आहेत. आता या जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करुन ठेवीदारांचे पैसे देण्याचा आदेश जिल्हा न्यायाधिश पी. आर. शित्रे यांनी दिला आहे. या आदेशामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला ठेवीदारांच्या ठेवी असुन परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे ठेवीदारांनी स्वागत केले आहे. ठेवीदारांची बाजू कोर्टात भक्कमपणे मांडणारे सरकारी वकील अ‍ॅड. अनिल ढगे, मुळ अ‍ॅड.सुरेश फिर्यादीचे लगड, वकील ठेवीदारांचे वकील अ‍ॅड. सुजाता बोडखे, ठेवीदार बचाव कृती समितीचे अध्यक्ष गणेश गिते यांना पेढा भरवून ठेवीदारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे ठेवीदारांना न्याय मिळाला आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला असे ठेवीदारांचे म्हणणे आहे. न्यायालयांत जवळपास ३०० ठेवीदार उपस्थित होते. आदेशानुसार श्रीनाथ मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे प्रशासक उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नगर हे या मालमत्तांचे लिलाव करणार आहेत.