आनंदऋषीजी नेत्रालयात पहिली बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

0
48

नगर – जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी नेत्रालयात पहिली कॉर्निया (बुबुळ) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. नेत्रालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.अशोक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.नलिनी महेंद्रुकर यांनी ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला दृष्टी परत मिळाली असून तो सामान्य जीवन जगू शकतो. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत मोफत करण्यात आली, अशी माहिती प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड यांनी दिली. संगमनेर येथील सौरभ विजय कानकेटे या तरूणाला दोन तीन वर्षांपासून डोळ्यांना त्रास होत होता. नातेवाईकांच्या सल्ल्याने तो नगरला आनंदऋषीजी नेत्रालयात आला. तपासणी केली असताना बुबुळ प्रत्यारोपण करणे आवश्यक वाटल्याने डॉटरांनी रूग्णाला त्याची कल्पना दिली. सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण करून ही नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. नेत्रालयातील अत्याधुनिक जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान व डॉटरांचे कौशल्य यामुळे नेत्रालयातील ही पहिलीच बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. रूग्णाला दृष्टी परत मिळाली आहे. आनंदऋषीजी नेत्रालयातील तत्पर आणि सर्वोच्च दर्जाची उपचार सेवा यामुळे आपल्याला नवी दृष्टी मिळाल्याची भावना रूग्णाने व्यक्त केली. आनंदऋषीजी . नेत्रालय अत्याधुनिक नेत्रोपचारांसाठी . ओळखले जाते. व्हिजन सेंटर, नेत्र शिबिरांच्या माध्यमातून नेत्रालयाने नगरसह बीड, धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रूग्णांना उत्कृष्ट सेवा दिली आहे. आतापर्यंत नेत्रालयात ७६ हजार पेक्षा अधिक यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. १९ नेत्रतज्ज्ञांची टिम रूग्णसेवेसाठी कार्यरत आहे. नेत्रालयातील ओपीडीमध्ये दररोज सुमारे ५०० रूग्णांची तपासणी करण्यात येते. तर २५ व्हिजन सेंटरमध्ये दररोज सुमारे ६०० रूग्णांची तपासणी करण्यात येते. वर्षभर शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक रूग्णांना उच्च दर्जाच्या उपचार सुविधांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असतो. कॉर्निया प्रत्यारोपण यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नेत्रालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.