माळीवाड्यात मनपाच्या मालकीच्या सौभाग्य मंगल कार्यालयात जनावरांचा गोठा

0
24
oplus_32
oplus_32

माळीवाडा भागातील वॉर्ड क्रमांक १२ मधील ब्राह्मण गल्ली (संत परशुराम गल्ली) भागातील महापालिकेच्या सौभाग्य
सदन मंगल कार्यालयाचा अक्षरश: कोंडवाडा झाला आहे तसेच या मंगल कार्यालयाच्या संपूर्ण आवारात अतिक्रमण झालेले
आहे. मनपा प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून पाहत असून आपल्या मालकीच्या मालमत्ता सांभाळण्यास सक्षम नसल्याचा संदेश
नागरिकांमध्ये जात आहे तसेच अनेक गैरप्रकार तेथे राजरोस सुरू असतात, त्यामुळे येथील नागरिक त्रासले आहेत. पण
मनपा प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. काही जण आपली जनावरे तेथे बांधतात. हे मंगल कार्यालय अनेक
वर्षांपासून बंद आहे. देखभाल दुरुस्ती, नूतनीकरण होत नसल्याने या कार्यालयाचा आता बोजवारा उडाला आहे. मनपाचे
शहरातील महाले मंगल कार्यालय, रंगारगल्ली, शिवपवन मंगल कार्यालय नालेगाव, भाग्योदय मंगल कार्यालय केडगाव या मंगल कार्यालयाचेही नूतनीकरण करणे गरजेचे आहे.