दैनिक पंचांग शनिवार, दि. १८ मे २०२४

0
144

शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, वैशाख शुलपक्ष, उत्तरा २४|२३
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

मेष :  आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करण्याचे प्रयत्न करता त्यावेळी त्रास होण्याची
शयता आहे. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी.

वृषभ : वाहने व उपकरणे जपून चालवा. आजचा दिवस थोडा कंटाळवाणा
आहे. अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील.

मिथुन : कार्यालयीन सहकार्यांची मदत राहिल. वडीलधार्‍यांचे मार्गदर्शन मिळेल.
नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तब्येत सांभाळा. आर्थिक लाभ.

कर्क : कार्याचा ताण आणि नवीन जबाबदार्‍या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे
कारण बनू शकतात. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते.

सिंह : कालच्या इतका आजच्या दिवस आनंदी जाणार नाही. आर्थिक स्थितीमध्ये
हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल.

कन्या : आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी सतावेल. आपल्या प्रयत्नाने
उन्नति कराल. धनलाभ होईल.

तूळ  :वरिष्ठांची मर्जी राहील. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा मूळ
मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे. मित्रांचा सहयोग मिळेल.

वृश्चिक : जास्त कार्यभार आपल्या मानसिक व्यग्रतेचे आणि ताणाचे कारण बनेल.
आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांची भेट घ्याल. वेळेच महत्व समजा. घरात मंगल कार्य होतील.

धनु : नव्या योजना आणि प्रोजेट्स आपण आज कार्यान्वित करताल. मागील
उधारी वसूल होईल. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्‍यांवर थोपू नका.

मकर : दिवस आनंदात जाईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या
बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधाना संबंधी विशेष योग.

कुंभ : कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष विचलीत करतील. चांगली संधी मिळेल.
मनस्थिती चांगली राहिल. इतरांना आपले विचार पटवून देण्यात आपण यशस्वी व्हाल.

मीन : सहकर्मी आपल्याबरोबर असतील. बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. आपल्या
कामांची समाजात चर्चा होईल. संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन
कल्पना सुचतील.

                                                                  संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर