दैनिक पंचांग रविवार, दि. १२ मे २०२४

0
123

श्री आद्य शंकराचार्य जयंती, शके
१९४६ क्रोधीनामसंवत्सर, वैशाख शुलपक्ष,
आर्द्रा १०|२७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल.

वृषभ : आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील. मनावर नियंत्रण ठेवा. मित्रांचा सहयोग मिळेल.
अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील.

मिथुन : भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शय
आहे. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. आजचा दिवस जोमदार ठरेल. दिवस संमिश्र जाईल.

कर्क : इच्छित विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये वरिष्ठांची सल्ला घेऊन पाउल टाका. शुभ वार्ता देखील मिळतील. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल.

सिंह : वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आपल्या आवडी निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे.

कन्या : धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. महत्वपूर्ण
कार्यांमध्ये यश मिळेल. आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात.

तूळ : आपणास समाधानकारक स्थिती मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. आरोग्याला त्रास होऊ शकतो. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल.

वृश्चिक : भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शयता आहे. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. कुटुंबियांच्या सहवासामुळे दिवस आनंदात जाईल. आरोग्य मध्यम राहील.

धनु : स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. संपूर्ण दिवस वातावरण होकारात्मक राहील. खाण्या-पिण्यात काळजी घ्या. दिवस आनंदात जाईल. मागील उधारी वसूल होईल. जोखिम असलेले कार्ये टाळा.

मकर : मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शयता आहे. दिवस
कालच्या इतका सकारात्मक जाणार नाही. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. काही नवीन संधी मिळतील.

कुंभ : आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. हसत खेळत वेळ खर्च होईल. पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो.

मीन : आरोग्य नरम-गरम राहील. मित्र मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मागील उधारी वसूल होईल. आर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर