राज्यभरात पुढील ७ ते ८ दिवस पुन्हा वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस

0
58

हवामान तज्ञ अशोक तोडकर यांचा अंदाज; विजा कोसळण्याचाही धोका

नगर – अहमदनगर, जालना, बीड, संभाजीनगर, परभणी बुलढाणा, वाशीम, पंढरपूर, नाशिकसह राज्यभरात गुरुवारी (दि.९) सायंकाळ पासून पुढील ७ ते ८ दिवस म्हणजे १७ मे पर्यंत पुन्हा वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस कोसळणार असून या काळात विजा कोसळण्याचाही धोका असल्याचा अंदाज जालना जिल्ह्यातील डहाळेगाव (घनसांगवी) येथील हवामान तज्ञ अशोक तोडकर यांनी व्यक्त केला आहे. तोडकर यांनी आपल्या युटुब लाईवद्वारे हा अंदाज व्यक्त केला आहे, त्यानुसार गुरुवारी दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होईल दुपारी दोन वाजेपर्यंत ढग जमू लागतील. व काही ठिकाणी वरील जिल्ह्यात संध्याकाळपर्यंत पाऊस सक्रिय होईल. कन्नड, सिल्लोड परिसरात भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव, राजा सिंदखेडराजा, चिखली, खामगाव यासह आणखी काही भागात तो सक्रिय होईल. वरील जिल्ह्यात सर्वाधिक जोर व वादळी वार्‍यासह पाऊस ११ ते १४ मे या कालावधीत होणार आहे. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यात १७ मेपर्यंत पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात राहील. हिंगोली, वाशिम जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी काही प्रमाणात व विशेष जोरदार आगमन शुक्रवारपासून होईल. या भागात १३ मेपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस राहील. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात गुरुवारी मोजया ठिकाणी पावसाची शयता आहे. मात्र १० ते १३ मे पर्यंत वरील जिल्ह्यात पावसाचे वातावरण खुपच राहील.

नगरसह काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होईल व पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढेल. पुणे, सांगली सातारा कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात वादळीवार्‍यासह पावसाची शयता आहे. जोर मात्र गुरुवारी मोजया ठिकाणी आहे. मात्र १० पासून १३ मे पर्यंत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात नुकसान कारक पाऊस होईल. अहमदनगर, पंढरपूर, बारामती सह अनेक ठिकाणी यावेळी चांगला पाऊस होणार आहे. पावसाचा सर्वाधिक जोर १२ व १३ मे रोजी राहील, असा अंदाज अशोक तोडकर यांनी वर्तविला आहे.