महावीर इंटरनॅशनलच्या ‘अहिंसा’ चित्रकला स्पर्धेस प्रतिसाद; अहिंसेचे विचार चितारण्यात नगरमध्ये रंगले शेकडो बालके

0
9

नगर – नगरच्या महावीर इंटरनॅशनलच्या वतीने नुकत्याच झालेल्या भगवान महावीर स्वामींच्या जयंतीचे औचित्य साधत अहिंसा या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य आनंदऋषी महाराजांचे समाधीस्थळ आनंदधाम येथे झालेल्या स्पर्धेस बाल चित्रकारांचा प्रतिसाद मिळाला. अलोकऋषी महाराजांनी चित्रकला स्पर्धेस भेट देवून सर्व सहभागींना आशीर्वचनरुपी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर शाखेचे अध्यक्ष अरुण पारख, महिला अध्यक्षा वैशाली शेटिया, युवा अध्यक्ष स्वप्नील डुंगरवाल, मिरॅकलचे अध्यक्ष चेतन संचेती, निलेश बोथरा, शैलेंद्र कोठारी, नूतन संचेती, राणी पारख आदींसह सदस्य उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेले शेकडो स्पर्धक अहिंसेचे विचार कागदावर चितारण्यात रंगले होते. यावेळी मार्गदर्शन करताना अलोकऋषी महाराज म्हणाले, स्पर्धेमुळे नव्या पिढीच्या बालकांना जैन समजाचे तीर्थंकर भगवान महावीर स्वामींच्या जीवनचरित्र्याचा परिचय होण्यास मदत होणार आहे. स्पर्धेचे आयोजन करून उत्कृष्ट उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मुलांची उन्हाळ्याची सुटी सार्थक लागणार आहे. भविष्यातही महावीर इंटरनॅशनलच्या वतीने महिला, पुरुष व बालकांचा उत्साह वाढण्यासाठी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करावे.

स्पर्धेत सहभागी सर्वाना व आयोजकांना सर्व जैन साधू साध्वींचे आशीर्वाद प्राप्त होतील, अशा शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात स्वप्नील डुंगरवाल यांनी विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. स्पर्धेत सहभागी बालकांनी भगवान महावीर स्वामींचा ‘जिओ और जिने दो’ हा बहुमूल्य संदेश आत्मसात करत अहिंसेचे विचार चित्राच्या रूपात कागदावर उतरवले आहेत. त्यामुळे बालकांना अहिंसेची शिकवण व महत्व पटल्याने ते पुढील जीवनातही अहिंसेचे पालन करतील. स्पर्धेतील विजेत्यांची नावे कुंदनऋषी महाराज, आदर्शऋषी महाराज व अलोकऋषी महाराज यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. स्पर्धेचा निकाल : लहान गट :- प्रथम : धानिष्का गुगळे, द्वितीय : दिशाली मुथा, तृतीय : भक्ती बरमेचा. उत्तेजनार्थ :- माही खिवंसरा व खुशी गुगळे. मोठा गट :- प्रथम : टीना पोखरणा, द्वितीय : रोहित उमाटकर व तृतीय : दिव्या कोठारी. विशेष पारितोषिक :- केसर छाजेड. सर्व विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली.