केडगाव बायपास रोडवर महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पळविली

0
27

सर्व कारखानदार त्रस्त; आरोग्याचा प्रश्न गंभीर, अहमदनगर महानगरपालिकेला निवेदन

नगर – नगर शहर परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडत असून त्या थांबायचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मोपेड गाडीवर बहिणीसोबत चाललेल्या महिलेच्या गळ्यातील १ तोळा वजनाची सोन्याची चेन पाठीमागून मोटारसायकल वर आलेल्या चोरट्याने हिसका मारून तोडून नेल्याची घटना बुधवारी (दि.२४) रात्री ८ च्या सुमारास केडगाव बायपास रोडवर घडली आहे. याबाबत संगीता पुंडलीक मोरे (वय ४२, रा. आदिशक्ती बंगलो, नेप्ती नायासमोर, दातरंगे मळा) यांनी गुरुवारी (दि.२५) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मोरे या त्यांची बहिण नंदिनी भरतभोज यांच्या सोबत मोपेड गाडीवर केडगाव बायपास चौकात एका कार्यक्रमासाठी कल्याण रोड बायपास चौकातून केडगाव कडे चाललेल्या होत्या. रात्री ८ च्या सुमारास केडगाव बायपास चौकात उड्डाणपुला शेजारील सर्व्हिस रोडने त्या जात असताना त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून एक अनोळखी इसम आला. त्याच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्याने अचाकन फिर्यादी मोरे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने हिसका मारुन खेचुन घेवुन भरधाव वेगात निघुन पुढे गेला, त्यानंतर फिर्यादी यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांने टोलनायाच्या अगोदर युटर्न घेवुन पुन्हा परत पाठीमागे भरधाव वेगात निघुन गेला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान नगर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हे चोरटे हिसका मारून तोडून नेत आहेत. मागील आठवड्यात मार्केटयार्ड मागील चैतन्य कॉलनीत सायंकाळी वॉकींगला चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने बळजबरीने हिसका मारून तोडून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा तसाच काहीसा प्रकार मागील शुक्रवारी तारकपूर परिसरात घडला. वारंवार होणार्‍या या घटनांमुळे शहर परिसरात महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.