केडगावच्या निवृत्त शिक्षिकेला १२ वर्षानंतर परत मिळाले चोरीला गेलेले सोन्याचे गंठन

0
6

नगर – १२ वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिनानिमि त्त केडगाव हून सकाळी लवकर नगरमधील शाळेत मोपेडवर चाललेल्या शिक्षिकेचे १ तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठन पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या सोनसाखळी चोरांनी चोरून नेले होते. या चोरट्यांना पकडून त्यांच्या कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला मात्र फिर्यादीचा शोध लागत नव्हता. अखेर आता सेवानिवृत्त झालेल्या त्या फिर्यादी शिक्षिकेचा शोध घेत त्यांना त्यांचे चोरीला गेलेले गंठन कोतवाली पोलिसांनी परत दिले आहे. सौ. सुनिता सोन्याबापू सोनवणे (रा. शाहुनगर, केडगांव) असे या निवृत्त शिक्षिकेचे नाव आहे. त्यांनी सन २०१२ मध्ये याबाबत फिर्याद दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपींना अटक करून त्यांच्या कडून मुद्देमाल हस्तगत केला होता. मात्र सुमारे १२ वर्ष उलटुनही यातील फिर्यादी सोनवणे यांचे सोन्याचे गंठन त्यांना परत मिळाले नव्हते. तसेच अश्या प्रकारचे बर्‍याच फिर्यादीचा गुन्हा दाखल होवुन मुददेमाल जमा झालेला असतांना फिर्यादी यांचे मोबाईल नंबर तसेच रहाण्याचा पत्ता बदलल्याने सदरचे जमा झालेले सोन्याचे दागिने परत करण्या करीता मोठी अडचण निर्माण होत असल्याने कोतवाली पोलीसांकडुन अशा तक्रारदारांची यादी काही महिन्यांपूर्वी जाहीर केली होती. याबाबत पो. हे.कॉ. तनवीर शेख व महीला पो.कॉ. जयश्री सुद्रीक यांनी मोठे परिश्रम घेत अशा प्रकारचे तक्रारदार यांचे नांवे, पत्ते, संपर्क नंबर शोधुन काढून त्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगुन न्यायालयाचे आदेशान्वये बर्‍याच लोकांना त्यांचा किंमती मुददेमाल कायदेशीर कामकाज पुर्ण करुन परत करण्यात आला. त्याच प्रमाणे सौ. सुनिता सोन्याबापू सोनवणे यांचा शोध घेवून त्यांना त्यांचे चोरीला गेलेले सोन्याचे गंठन कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.