सर्व इन्शुरन्स कंपन्यांना डेंटल इन्शुरन्स बंधनकारक करण्यासाठी प्रयत्न करावा

0
34
Oplus_0

 

डेंटल सर्जन असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे डॉ. सुदर्शन गोरे यांचे शरद पवार यांना निवेदन

नगर – भारतातील कोणत्याही आरोग्य विमा कंपन्यांकडे डेंटल इन्शुरन्स उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना दातांच्या उपचारापासून वंचित रहावे लागत आहे, तरी शरद पवार यांनी लक्ष घालून या सर्व हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांना डेंटल इन्शुरन्स बंधनकारक करावे असे निवेदन डेंटल सर्जन असोसिएशन ऑफ इंडिया चे समन्वयक दंततज्ञ डॉटर सुदर्शन गोरे यांनी शरद पवार यांना दिले. नुकतेच स्वाभिमान संवाद यात्रा प्रसंगी शरद पवार हे नगरला आले असताना डेंटल सर्जन असोसिएशन ऑफ इंडियाच्या विशिष्ट मंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन ही मागणी केली. या मागणीवर चर्चा करताना शरद पवार म्हणाले की, या महत्वाच्या आशा डेंटल इन्शुरन्स प्रश्नी भविष्यात नक्कीच अर्थमंत्री व आरोग्य मंत्री यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न करू व हा प्रश्न मार्गी लावू. म्हणजे सर्वसामान्यांना डेंटल इन्शुरन्स फायदा होऊन ते दाताचे उपचार करून घेऊ शकतील. याप्रसंगी महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, उद्योजक संजय गारुडकर, दंततज्ञ डॉ. सुदर्शन गोरे, डॉ. केतन गोरे, डॉ. तेजस पाटील, डॉ. नितीश इंगळे, डॉ. कुणाल वालकर व शहरातील दंत तज्ञ उपस्थित होते. सदर डेंटल इन्शुरन्सचा प्रश्न अनेक वर्षापासून दुर्लक्षित असुन संसदेत हा प्रश्न मांडून डेंटल इन्शुरन्स लागू करण्यासाठी प्रयत्न करावा असे निवेदन डॉ. सुदर्शन गोरे यांनी दिले.