गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांचा छापा; ३४ टाक्या, इलेक्ट्रिक मोटार व साहित्य जप्त

0
33

नगर – नगर शहरातील कोठला भागात कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि.१८) रात्री ८ च्या सुमारास छापा टाकत ३४ गॅस टाया, इलेट्रिक मोटार पंप व साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी अन्सार अली सय्यद (रा. मुकुंदनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोठला भागात कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे दोस्ती हॉटेलच्या जवळ एका बंद टपरीच्या आडोशाला अवैध गॅस रिफिलिंग केली जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुरुवारी (दि.१८) रात्री ८ च्या सुमारास तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापरासाठीच्या २० भरलेल्या गॅस टाया व १४ मोकळ्या अशा एकूण ३४ गॅस टाया, इलेट्रिक मोटार पंप व गॅस रिफिलिंग करण्याचे साहित्य, वजनकाटा असा मुद्देमाल मिळून आला. तो पोलिसांनी जप्त केला. याबाबत पो.कॉ. बाळासाहेब भापसे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अन्सार अली सय्यद (रा. मुकुंदनगर) याच्या विरुद्ध भा.दं. वि. कलम २८५, २८६, ३३६ सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.