महिलेच्या सोन्याच्या बांगडीची चोरी

0
32

नगर – तारकपूर बसस्थानकावर बसची वाट पाहणार्‍या शितल चंद्रकांत थोरात (रा. जाधवमळा, बालिकाश्रम रोड, नगर) यांची पर्समध्ये ठेवलेली ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही चोरीची घटना ११ एप्रिल रोजी सायं. ५.१५ वा. घडली. यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम ४७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हे.कॉ. गंगावणे हे करीत आहेत.