ढंपर चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद

0
44

नगर – ३० लाख रुपये किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा हायवा ढंपर (क्रमांक एम.एच.१७ ए. जी. ९२२२) हा ०५ एप्रिल रोजी राहुरी फॅटरी येथील मुसम ाडे यांचे पेट्रोलपंपावर लावलेला असतानां कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. सदर घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी राजेंद्र लक्ष्मण मुसमाडे वय ५७ वर्षे, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी यांच्या फिर्यादीनुसार गु.र.नं. ४०१/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर ढंपर चोरी करणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले. पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, पोना संदीप चव्हाण, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे यांचे पथक तयार करुन पथकास गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले. पथकाने शिर्डी परिसरामध्ये फुटेजमध्ये संशयीरित्या दिसुन येत असलेल्या इसमाची ओळख पटवुन त्याचे नांव प्रकाश एकनाथ कदम रा. साकुरी, ता. राहाता, जि. अहम दनगर असे असल्याचे निष्पन्न केले.

प्रकाश कदम याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्यातील चोरीस गेले ढंपरबाबत सखोल विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार समीरखान नसिरखान पठाण, रा. खंडाळा, ता. वैजापुर, जि. छ. संभाजीनगर व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार अशांनी केला असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या ढंपरबाबत विचारपुस करता त्याने सदरचा ढंपर हा नाला नंबर ३२ वरील जाधव वस्ती जवळ, रुई शिवार, ता. राहाता, जि. अहमदनगर या ठिकाणी असलेल्या काटवनात लावलेला असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी जावुन खात्री करता काटवनामध्ये गुन्ह्यातील ढंपर मिळुन आला आहे. तसेच समीरखान पठाण व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदारांचा शोध घेता ते मिळुन आले नाही. सदर ढंपर पथकाने ताब्यात घेतला आहे.