खेळामुळे संघभावना, नेतृत्त्वगुण विकसित होण्यास मदत : सी.ए. अशोक पितळे

0
26

नगर – खेळामुळे संघभावना, नेतृत्त्वगुण विकसित होण्यास मदत होते. जैन ओसवाल युवक संघाने राहुल पितळे यांच्या स्मरणार्थ क्रेझी क्रिकेट स्पर्धा आयोजित करून अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. पितळे हे जॉईजच्या स्थापनेपासूनचे सक्रिय सभासद होते. या स्पर्धे त सर्व खेळाडूंनी खेळाचा निखळ आनंद घ्यावा. यातून एकत्र येत, आपुलकीचा संवाद घडण्यास मदत होईल, एकमेकांचा परिचय होईल, नवीन मैत्री, स्नेहबंध जुळतील असा विश्वास जैन ओसवाल पंचायत सभेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष सी.ए. अशोक पितळे यांनी व्यक्त केला. अहमदनगर जैन ओसवाल पंचायत सभेच्या जैन ओसवाल युवक संघ (जॉइज) च्यावतीने नगरमध्ये सोहम कप क्रेझी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर लब मैदानावर समारंभात स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अशोक पितळे बोलत होते. कार्यक्रमास श्रीमती राखी पितळे, जैन ओसवाल पंचायत सभेचे सहसेक्रेटरी तथा सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी, संचालक चेतन भंडारी, कमलेश भंडारी, सी.ए. गौरव पितळे, उद्योजक अभिजीत गांधी, प्रमोद गांधी, जॉइजचे अध्यक्ष प्रतिक बाबेल, सचिव सचिन मुनोत आदी उपस्थित होते. स्वागत करताना प्रतिक बाबेल म्हणाले की, जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. खेळामुळे शारीरीक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मोठी मदत होते. क्रेझी क्रिकेट हा क्रिकेटचा हटके आणि निखळ आनंद देणारा प्रकार आहे. सर्वांनी अतिशय खिलाडूवृत्तीने स्पर्धेत सहभागी होवून चांगले प्रदर्शन करावे. १६ एप्रिल पर्यंत ही स्पर्धा होणार असून मुख्य संघांसह महिलांचे व मुलांचे संघ सहभागी झाले आहेत. विजेत्यांना रोख पारितोषिकासह ट्रॉफी तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय मॅन ऑफ दि मॅच, मॅन ऑफ दि सिरीज, बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज, बेस्ट क्षेत्ररक्षक अशी पारितोषिकेही असणार आहेत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन मुनोत यांनी केले स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन ओसवाल युवक संघ व जैन ओसवाल पंचायत सभेचे पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.