२ ठिकाणी गोमांस विक्री करणार्‍यांवर कारवाई, गोमांस, वजनकाटे, सत्तूर जप्त करत दोघांवर गुन्हे दाखल

0
29

नगर – राज्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास आणि गोमांस विक्री करण्यास बंदी असतानाही नगर शहरात गोमांस विक्री केली जात असल्याने तोफखाना पोलिसांनी २ ठिकाणी छापे टाकत गोमांस, वजनकाटे, सत्तूर असे साहित्य जप्त करत गोमांस विक्री करणार्‍या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. तोफखाना पोलिसांच्या पथकाने पहिली कारवाई बुधवारी (दि.१०) दुपारी १२.१० च्या सुमारास सर्जेपुरा येथील साई बेकरीच्या पाठीमागे असलेल्या गाळ्यात केली. तेथे ६ हजार २०० रुपये किमतीचे ३१ किलो गोमांस, १ लोखंडी वजनकाटा, सत्तूर असा एकूण ७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तन्वीर सत्तार कुरेशी (रा. सुभेदार गल्ली, अहमदनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरी कारवाई बुधवारी (दि.१०) दुपारी १२.२० च्या सुमारास सर्जेपुरा येथील कौलारू भागात केली. तेथे ६ हजार ४०० रुपये किमतीचे ३२ किलो गोमांस, १ लोखंडी वजनकाटा, सत्तूर असा एकूण ७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत इम्रान हनीफ कुरेशी (रा. झेंडीगेट, अहमदनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.