कारमधून गोमांस वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी पकडले

0
63

१०० किलो गोमांस व कार जप्त; केडगाव बायपास चौकात कारवाई

नगर – कार मधून गोमांस वाहतुक करणार्या तरूणाला कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास चौक येथे पकडले. साजिद खाजामियाँ कुरेशी (वय ४०, रा. सदर बाजार, भिंगार) असे पकडलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून १०० किलो गोमांस व एक कार असा ४ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक व्यक्ती त्याच्या ताब्यातील कार (क्र.एमएच ०४ सीजे १८८३) मधून गोवंशीय जनावरांचे मांस घेवुन नगर ते पुणे रस्त्याने जाणार आहे, अशी माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना पंचासह कारवाई करण्याबाबत आदेश दिले. गुन्हे शोध पथकाने तात्काळ पंचाना बोलावुन घेवुन सदर कारचा शोध घेतला असता कार केडगाव बायपास चौक येथे दिसली. कार चालकाने त्याचे नाव साजिद खाजामियाँ कुरेशी असे असल्याचे सांगितले. कारच्या डिक्कीत तीन प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये १०० किलो गोवंशीय जनावरांचे मांस मिळुन आले. कार व मांस असा ४ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, अंमलदार शाहीद शेख, योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, अविनाश वाकचौरे, संगिता बडे, दीपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सुरज कदम, अमोल गाडे, अभय कदम, सुजय हिवाळे, शिवाजी मोरे, सचिन लोळगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.