श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बलिदान मास व मुकपदयात्रेद्वारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना

0
20
UNJ

 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बलिदान मास व मुकपदयात्रेद्वारा

नगर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासची सांगता शहरात मूक पदयात्रा काढून केली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने प्रतिवषीप्रमाणे बढु बुद्रुक (जि. पुणे) या संभाजी महाराजांच्या समाधीस्थळापासून धर्मज्योत आणण्यात आली. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेस पकडले गेलेल्या क्षणापासून, अतिक्रूर पाशवी छळ सहन करणार्‍या श्री संभाजी महाराजांचा रोज एक एक अवयव तोडत होते. रोज अंगाची साल सोलून काढत होते. शेवटी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पायापासून डोयापर्यंत देहाचे कुर्‍हाडीने तुकडे तुकडे केले व तुळापूरच्या जंगलात फेकून दिले. छ. संभाजी महाराजांच्या न निघालेल्या अंतयात्रेचे स्मरण म्हणून गेली ३० वर्षे श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने फाल्गुन अमावस्येच्या दिवशी मुकपदयात्रेचे आयोजन केले जाते. नगर जिल्ह्यातील ११ तालुयात हा उपक्रम राबविण्यात आला. संभाजी महाराजांच्या संमाधीस्थळी वढु (बु॥) तुळापूर, जि. पुणे येथून ३१ मार्च तारखेला रात्री धर्मवीर ज्वाला पेटवून नगर येथे पायी आणण्यात आली.

ती ज्वाला पेटती ठेवून नगर तालुयातल्या निंबोडी, दरेवाडी, वाळुंज, अकोळनेर, सारोळा, शेंडी, भातोडी, बाराबाभळी, देहरे या गावांमध्ये नेऊन मुकपदयात्रा काढण्यात आली व श्रद्धांजली वाहण्यात आली. फाल्गुन अमावस्येला नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते छत्रपती संभाजी महाराज चौक नालेगावपर्यंत शहरातील मुख्य म ार्गावरून मुकपदयात्रा काढण्यात आली. मुकपदयात्रेच्या मार्गावर चौका चौकात धर्म ज्योतेचे स्वागत पुष्पहार घालून करण्यात आले माळीवाडा, आशा टॉकीज चौक माणिक चौक कापडबाजार, तेलीखुट, चितळे रोड, चौपाटीकांरजा, नालेगावमार्गे मुकपदयात्रेचा समारोप धर्मवीर संभाजी महाराज नेप्तीनाका नालेगाव येथे झाला. नेप्ती येथे यज्ञकुंडात धर्मवीर ज्वालाचे विसर्जन केले व भारतम ातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ या वेळी धारकर्‍यांनी घेतली. शिवरायांचे आठवावे रुप….. या ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नगरजिल्हा प्रमुख बापू ठाणगे, शिवप्रतिष्ठानचे हिदुस्थानचे शहराध्यक्ष देवीदास मुदगल, दिनेश जोशी, शिवप्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.