सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ

0
47

मुंबई – आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात बदल झाला आहे. होळीनंतर सोन्या-चांदीचे दर प्रचंड वाढले ज्यामुळे तुम्हालाही खरेदी करायची असेल तर सोने आणि चांदीचे नवीन दर घेतले पाहिजे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून एप्रिलच्या पहिल्या सहा दिवसांत सोने आणि चांदीने मोठा पल्ला गाठला. सोन्या आणि चांदीच्या किमतींनी आठवड्याची सुरुवात जोरदार तेजीसह केली आणि दोन्ही मौल्यवान धातूचे वायदे मागील रेकॉर्ड तोडून नव्या शिखरावर पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या फ्युचर्सने प्रथमच ७० हजार रुपयांचा पल्ला गाठला जो आज प्रथमच ७१,००० रुपयांच्या पुढे गेला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही भविष्यात सोन्या-चांदीच्या भावात वाढ होण्याची शयता असून सोन्याचे फ्युचर्स विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. एचडीएफसी सियुरिटीचे कमोडिटी आणि करन्सी हेड अनुज गुप्ता यांनी सांगितले की, फेड रिझर्व्हकडून व्याजदर कमी करण्याच्या शयतेमुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. तर आता आंतरराष्ट्रीय तणावामुळे किमती नव्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

सोन्याचे फ्युचर्स नवीन विक्रमी पातळीवर वायदे बाजारात सोन्याची सुरुवात मंदावली पण नंतर किंचित तेजीसह ७०,५४४ रुपये प्रति १० ग्रॅमवर वाढली. मल्टी कमोडिटी एसचेंज (एम सी एस) वर सोन्याचे जून फ्युचर्स ३६३ रुपयांनी वाढून ७०,९९९ रुपयांवर उघडले तर सध्या ३५३ रुपये वाढीसह ७०,९८९ रुपयांवर पोहोचले. दरम्यान सोन्याने ७१,०५७ रुपयांचा दिवसाचा उच्चांक तर ७०,९४० रुपयांचा नीचांक नोंदवला. चांदीची किंमतही नव्या उच्चांकावर आठवड्याच्या सुरुवातीला चांदीचे वायदेही तेजीत राहिले आणि विक्रमी शिखरावर उसळले. एम सी एस वर चांदीचा मे वायदा ७३२ रुपयांनी वाढून ८१,५९५ रुपयांवर पोहोचला तर सध्या ७६३ रुपयांच्या वाढीसह ८१,६२६ रुपयांवर व्यापार करत होता. देशांतर्गत बाजारात वाढणारी मागणी तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे जगभर बेशकिंमती धातूंच्या किंमतीत दरवाढीचे सत्र सातत्याने पाहायला मिळत आहे. यामूवले गेल्या काही दिवसात ग्राहकांना दिवसाच तारे दिसत आहेत. जागतिक बाजारातही सोने-चांदीला झळाळी दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या फ्युचर्सच्या किमतीची सुरुवात मंदावली, पण सुरुवातीच्या मंदीनंतर भाव विक्रमी पातळीवर पोहोचले. कॉमेसवर सोन्याची किंमत २,३४३.६० डॉलर प्रति औंसवर उघडली तर मागील बंद किंमत २,३४५.४० डॉलर होती. त्याचवेळी कॉमेसवर चांदीचे फ्युचर्स मागील बंद किंमत २७.५० डॉलरच्या तुलनेत सकाळी २७.५५ डॉलरवर उघडले. अशा परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ पाहायला मिळाली आहे.