मोदींचे बेगड पांघरून शुध्दीकरण झालेल्या सैराटांना निवडणुकीत जनतेने धूळ चारावी

0
20

भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये शुध्दीकरण करुन घेतलेल्यांची ही निरोपाची निवडणूक ठरणार : ॲड. सुरेश लगड

नगर – मोदींचे बेगड पांघरून व भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये शुध्दीकरण करुन सैराट झालेल्या सर्वांना महाराष्ट्र नव्हे; तर देश ओळखतो. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशा सैराटांना जनतेने धूळ चारण्याची गरज असल्याची भावना अ‍ॅड. सुरेश लगड यांनी व्यक्त केली आहे. इंग्रजांनी या देशावर दीडशे वर्ष राज्य केले. त्यापूर्वी शेकडो वर्ष हा देश गुलामगिरीत होता. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले; परंतु काही पुढार्‍यांनी स्वतःचे घर भरण्यापलीकडे काही एक कार्यक्रम चालू ठेवले नाहीत. गेल्या चार-पाच वर्षात मोदींचे बेगडे पांघरून व भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये शुध्दीकरण करुन स्वच्छ होणार्‍यांची संख्या वाढली आहे. अनेक वर्ष नगर जिल्ह्यावर सत्ता चालवणारे विखे देखील त्याला अपवाद नाही. नुकतेच अशोक चव्हाण हे देखील काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये दाखल होवून स्वच्छ झाले असल्याचा आरोप अ‍ॅड. लगड यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबला शह देवून पेटार्‍यातून सुटका करून घेतली. त्यामध्ये महान मूत्सदेगिरी होती. परंतु सध्याच्या काळात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करायचा आणि जेलमध्ये जाण्याची आणि ईडीची भोकाडी दारात आली की मोदींचे बेगड पांघरून ही मंडळी सैरावैरा धावायला लागली आहे.

परंतु देशातील तमाम मतदार जनता अशा सैराटांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अ‍ॅड. लगड यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्याची फळे सामान्य माणसाला देण्याऐवजी फक्त घोषणांचा पाऊस दिल्लीपासून गल्लीपर्यंत पाडला जातो. त्यातून धर्माच्या नावावर मतदारांच्या डोळ्यात धुळफेक केली जाते, याची देखील जाणीव संपूर्ण देशाला झाली आहे. ज्यांनी भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये शुध्दीकरण करुन घेतले, अशा सैराटांना सर्व जनता या निवडणुकीत निरोप दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे घराघरात देशभरात मतदारांनी डोळ्यात तेल घालून अशा सैराटांना संपवण्याचे एक कलमी कार्यक्रम चालू ठेवावा. नगर दक्षिण मतदार संघात निलेश लंके यांच्याशिवाय कोणीही पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे विखे यांची ही निवडणूक निरोपाची निवडणूक ठरणार असल्याचे म्हंटले आहे.