कत्तलीसाठी चालविलेल्या जनावरांचा टेम्पो पकडला

0
29

नगर – कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय जनावरांचा टेम्पो गोरक्षकांच्या मदतीने नगर तालुका पोलिसांनी पकडून २ जर्शी गायींची सुटका केली आहे. नगरय्कल्याण रोडवर नेप्ती गावच्या शिवारात शुक्रवारी (दि.५) पहाटे ही कारवाई करण्यात आली. एका अशोक लेलंड कंपनीच्या छोट्या टेम्पोत काही जनावरे दाटीवाटीने बांधून ते कत्तल करण्यासाठी कल्याण रोडने नगरकडे नेण्यात येत आल्याची बाब गोरक्षकांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्या टेम्पोचा पाठलाग सुरु केला. तसेच नगर तालुका पोलिसांना याची माहिती दिली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी मंगेश खरमाळे, अर्जुन रोहकले, बांगर यांनी तेथे जावून नेप्ती शिवारात गोरक्षकांच्या मदतीने टेम्पो पकडला. त्यात २ जर्शी गायी कत्तल करण्यासाठी नेण्यात येत होत्या. पोलिसांनी तो टेम्पो ताब्यात घेत टेम्पोतील माजीद साजिद कुरेशी व शकील हिनायत सौदागर (दोघे रा. व्यापारी मोहल्ला, सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहमदनगर) यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पो. ना. गायत्री धनवडे या करीत आहेत.