नगरसह राज्यात गारपीटीसह ‘अवकाळी पावसा’ची शक्यता

0
44

पावसाचा यलो अलर्ट तर अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुणे – राज्यात उष्णतेत कमालीची वाढ झाली असून अंगाची लाहीलाही होत असताना हवामान विभागाने उष्णतेची लाट वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर नगर जिल्ह्यासह राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावासाचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याला सध्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जिल्ह्यांत हलया सरी बारसण्याची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट

हवामान विभागानुसार मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शयता आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट असेल त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी सोलापूर जिल्हा देशभरात सर्वाधिक तापमान असणार्‍या शहरांच्या यादीत नोंद झाली आहे. सोलापूर शहरात शुक्रवारी ४३.१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांत सध्या पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे.

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचेही संकट

राज्यात ७ ते १० एप्रिलदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शयता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आजपासून ८ एप्रिल पर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक, अहमदनगर, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ६ एप्रिलनंतर अवकाळी पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

वातावरणात का होत आहेत बदल?

आज विदर्भासह काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असला तरी त्यानंतर होणार्‍या पावसाने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शयता आहे. रविवार (दि.७) पासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वार्‍यामुळे विदर्भात रविवारी आणि सोमवारी (दि.८) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भापासून, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात सध्या ढगाळ आकाश होत असून, उन्हाच्या झळा, उकाडा कायम आहे. रात्री उष्ण ठरत असून, पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्यात सतत होणार्‍या या हवामान बदलामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.