जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा

0
33

जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांचे आवाहन नगर – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटना प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत श्री. सालीमठ बोलत होते. यावेळी बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, दिव्यांग व्यवस्थापक नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण राधाकिसन देवढे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद घाट डॉ. दिपक अनाप आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी व्हिल चेअर, रॅम सुविधा, वाहतुक व्यवस्था, अंध मतदारांसाठी ब्रेन लिपीत मतदान सुविधा आदि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी लोकसभा निवडणूकीत मतदान करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मणराव पोकळे, सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब महापुरे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना राज्य संचालक संतोष सरवदे, जिल्हा मुक बधिर अशोसिएशनचे अध्यक्ष आनंद कडूस, असान अपंग संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे, वसंत शिंदे, साहेबराव अनाप, जालिंदर लहामगे, मधुकर घोडके, बबन म्हस्के, राजेंद्र पोकळे आदी संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित होते.