संचालक व भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून फसविल्या गेलेल्या ठेवीदारांची १७ मार्चला नगरमधे ‘वज्रमुठ सभा’

0
34

नगर – शहरातील आर्थिक अनियमतेमुळे व व्हॉईटकॉलर संचालक, भ्रष्ट अधिकारी यांच्या भ्रष्टाचारामुळे बंद पडलेल्या सर्व पतसंस्थेतील त्याचबरोबर नगर अर्बन बँकेतील ठेवीदारांना आवाहन करण्यात आले आहे की, शहरातील बंद पडलेल्या पतसंस्थातील ज्येष्ठ नागरिक, असहाय आजारी महिला ठेवीदार अडचणीत आलेल्या आहे. त्यांच्या ठेवी त्यांना मिळू शकलेल्या नाहीत. त्यासाठी सर्व पतसंस्थातील ठेवीदारांनी एकत्रीत संघटीत होऊन मजबूत संघटन करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व बंद पडलेल्या पतसंस्थेतील ठेवीदारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी तसेच त्यांच्या ठेवी लवकरात लवकर मिळून देण्यासाठी नगर अर्बन बँक बचाव समितीच्या वतीने आवाहन करण्यात आहे की, पतसंस्थेतील सर्व ठेवीदारांनो संघटीत व्हा.

त्यासाठी सर्व पतसंस्थेतील फसविल्या गेलेल्या ठेवीदारांची नगर अर्बन बँकेतील ठेवीदारांसह वज्रमुठ सभा व मेळावा १७ मार्च दुपारी ४ वाजता शहीद भगतसिंह स्मारक, पत्रकार चौक, सावेडी रोड, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त पतसंस्थेतील ठेवीदारांनी उपस्थित रहावे. यावेळी सर्व ठेवीदारांची व अर्बन बँकेतील ठेवीदारांसह एक समन्वय समिती गठीत करण्यात येईल. आपल्या ठेवीदरांनी स्वत: उपस्थित रहावे. आपली एकजूट आपल्याला यशाच्या मार्गाकडे घेवून जाणार आहे. सर्वांनी सहकार्य करून सभेस उपस्थित रहाण्याचे आवाहन निमंत्रक धोंडोपंत कुलकर्णी (नगर अर्बन बँक), विजयराव धामणे, आण्णासाहेब पठारे, (प्रवरा बँक, लोणी तथा रावसाहेब पटवर्धन पतसंस्था) आदींसह अर्बंन बँक बचाव समितीने केले आहे.