‘आकांक्षा’ व ‘रोटरी प्रियदर्शनी क्लब’सारखी संस्था हातात हात धरून काम करताना अनेक लोक जोडली

0
60

डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांचे प्रतिपादन; आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी आयोजित दिव्यांग महिला मेळावा

नगर – कर्तृत्ववान आई स्त्री शक्ती सन्मान जयश्री काळे (अंध मुलगी), कुसुम गोरडे (मतिमंद मुलगा), कांता दारूणकर (अस्थिव्यंग मुलगी) तसेच आटाचक्की परवीन सय्यद, शिलाई मशीन रूबाना शेख यांना प्रदान करण्यात आला. आपुलकी, प्रेम माणसामधील हा ओलावा दिसत राहणे हे मनोबल वाढवणार असते. आपण वेगळे आहोत तरीसुध्दा हसू शकतो त्यावर मात करू शकतो हे फार महत्वाचे आहे अशी मदत करणारी माणसे, माणुसकीची बेटे आजुबाजूला असावीत आकांक्षा व रोटरी प्रियदर्शनी लबसारखी संस्था हातात हात धरून काम करताना अनेक लोक जोडली अश्या संस्था असल्यास हे जग बदलेल, असे प्रतिपादन स्नेहांकुर दत्तक विधानाच्या संस्थापिका प्रमुख डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व रोटरी लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग महिला मेळाव्यात कर्तृत्ववान आई स्त्री शक्ती सन्मान जयश्री काळे (अंध मुलगी), कुसुम गोरडे (मतिमंद मुलगा), कांता दारूणकर (अस्थिव्यंग मुलगी) तसेच आटाचक्की परवीन सय्यद, शिलाई मशीन रूबाना शेख यांना प्रदान करण्यात आला. स्नेहांकुर दत्तक विधानाच्या संस्थापिका प्रमुख डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, आकांक्षाच्या अध्यक्षा सविता काळे, रोटरी प्रियदर्शनी अध्यक्षा देविका रेळे, रो. कुंदा हळबे, रो. प्रतिभा धूत, रो. मिनल बोरा, डॉ. अंशु मुळे आदी उपस्थित होते. रंजना ब्रह्मा यांनी आटाचक्की व रो. निना मोरे व सॅम मोरे, रो. देविका रेळे, रो. मिनल बोरा यांनी शिलाई मशिनसाठी आर्थिक साहाय्य केले. कार्यक्रमाचे .

उदघाटन मुकबधीर विदयालयाच्या माजी ज्येष्ठ शिक्षिका रत्नमाला परदेशी यांनी केले. दिवसभर सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजूषा तसेच अंध व्यक़तीच्या हातावर मेंदी काढणे, फुगे फोडणे अश्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कर्णबधीराशी संवाद साधण्यासाठी दुभाषीचे काम कावेरी गोसावी यांनी केले. आकांक्षा अध्यक्षा सविता काळे यांनी दिव्यांग व्यक्तिच्या आईचे महत्व अनन्यसाधारण असून संकटावर मात करत यांनी केलेले काम समाजासाठी प्रेरणादायी आहे आकांक्षा अश्या व्यक्तिच्या नेहमी पाठीशी आहे व राहील. प्रास्ताविक रोटरी प्रियदर्शनी अध्यक्ष देविका रेळे यांनी केले. डॉ. अंशू मुळे यांनी महिला आरोग्य, समस्या व उपाय या विषयावर मागदशन केले. अतिथी परिचय रोटरीयन कुंदा हळबे यांनी करून दिला. रो. प्रतिभा धूत, रो. कुंदा हळबे, रो. मिनल बोरा, आकांक्षाचे हेमंत काळे, अनुराधा पाटील, विदया पटवधन आदी यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार अंजली सूर्यवंशी हिने केले.