राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक

0
30

नगर – अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक पक्ष कार्यालय येथे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी जिल्हा अध्यक्ष अथर खान, प्रदेश उपाध्यक्ष शौकत तांबोळी, प्रदेश उपाध्यक्ष शफिक शेख, सोहेल काझी, माजी महापौर अभिषेक कळमकर, पापामिया पटेल, फैयाज कुरेशी, रहमान खान, फारूक रंगरेज, आरिफ पटेल, नामदेव पवार, निलेश मालपाणी, प्रकाश पोटे, समीर पठाण, मुन्ना चमडेवाले, बाबा सय्यद, मोसिन पठाण, अनिस शेख, फरहाज पठाण, अक्रम अतार, गालीब सय्यद, माजी नगरसेवक अय्युब शेख, आसाराम कावरे आदीसह तालुयातील अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना जावेद हबीब म्हणाले की, इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान केले व शरदचंद्र पवार यांचे ध्येय धोरण अल्पसंख्याक समाजात पोहोचवण्याचे आव्हान केले. हाजी शौकत तांबोळी म्हणाले की, येणारा काळ हा फार कठीण असून सर्वांनी जागृत होऊन मतदान घडून आणावे असे आव्हान तांबोळी यांनी व्यक्त केले.

अभिषेक कळमकर यांनी सर्व अल्पसंख्याक समाजास यापुढे एकजुटीने मतदान करण्याचे आव्हान केले. प्रास्ताविकात अथर खान म्हणाले की, शरदचंद्र पवारांनी अल्पसंख्याक समाजाच्या पहिल्या महाराष्ट्राचे मंत्री फौजिया खान यांना केले त्यांना दोन वेळेस विधानपरिषद व एक वेळा राज्यसभेवर पाठवून खासदार केले तसेच पाथरीच्या बाबा जानी दुर्रानी यांना विधान परिषदेत घेऊन आमदार केले, अ‍ॅड. माजिद मेमन यांना राज्यसभा खासदार केले केंद्रात अल्पसंख्याक समाजाच्या तारीक अन्वर यांना मंत्री केले. अनेक उदाहरण शरदचंद्र पवारांच्या अल्पसंख्याक समाजाविषयीचे आहे. ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात जातीय तणाव वाढला त्या त्या वेळेस पवारांनी सदर तणाव कमी करून सर्वांना धीर दिला असे अथर खान यांनी म्हटले. जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण यांनी आभार मानले.