जितो प्रिमियर लीग स्पर्धेसाठी चेन्नई येथे जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचा संघ रवाना

0
37

नगर – जितो स्पोर्टस अपेस, जितो चेन्नई चाप्टर, जितो टिएनएपीटीएस झ़ोन यांच्या संयुक्त विद्यमाने चेन्नई येथे ६ ते ८ मार्च दरम्यान जितो प्रिमियर लीग २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचा संघ नुकताच रवाना झाला आहे. यावेळी जितोचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल ओसवाल उपस्थित होते. या संघाचे कोच म्हणून रणजीपटू अनुपम संकलेचा संघाबरोबर असतील. तर संघाचा कर्णधार नगरचा सौरभ संकलेचा आहे. टीममध्ये सौरभ शिंगवी, गौतम मुनोत, अभिषेक कोठारी (नगर), हर्ष संगवी, अनुज छाजेड, आदर्श बोथरा, दर्शन गांधी, स्वप्निल चोरडिया, यश बांबोली, हर्ष ओसवाल, पार्थ बाफना (पुणे), तनय संगवी, साहिल पारिक (नाशिक), आदर्श जैन (छत्रपती संभाजीनगर) या खेळाडूंचा समावेश आहे. ७ आणि ८ मार्च रोजी स्पर्धेतील साखळी सामने होणार आहेत. ९ मार्च रोजी अंतिम सामना व रंगारंग बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. या संघास जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष गौतम मुनोत, सेक्रेटरी अमित मुथा, जितो अहमदनगरचे चेअरमन जवाहर मुथा, सेक्रेटरी आलोक मुनोत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.