पदाचा दुरुपयोग महानगरपालिका आयुक्त यांनी अहमदनगर नामांतरांचा ठराव मंजूर करुन घेतला

0
61

नगर – काही दिवसापासून अहमदनगर नामांतराचा विषय चर्चेत आहे. काही राजकीय नेते आपल्या राजकारणासाठी अहमदनगरचं नाव बदलण्याचा षडयंत्र करत आहे. आम्ही अहमदनगरकर या नात्याने आयुक्त महानगरपालिका, जिल्हाधिकारी अहमदनगर आणि सरकार यांना अहमदनगर नाव न बदलण्याची विनंती केली होती. तसेच जर सरकारने अहमदनगरचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाच असेल तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व एमआयएमतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आणि चुलते शरीफजीराजे भोसले यांचे नावाने अहमदनगरला शाहशरीफनगर असे नाव देण्याचे सुचविले होते. पूर्ण भारत देशात मोजके असे शहर आहेत ज्यांचा इतिहास सापडतो. त्यात अहमद निजाम शाह यांनी बसवलेला अहमदनगर आहे.

अहमदनगर हा बसवलेला असून कोणीही याचा नामांतरण कधीही केलेला नाही. आम्ही सरकारला सुचवले होते की अहमद निजामशहा नंतर अहमदनगरमध्ये सर्वात मोठा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज शहाजीराजे भोसले आणि शरीफजीराजे भोसले यांचा आहे. त्याचप्रमाणे अहमदनगरमध्ये विविध संघटनेने वेगवेगळे नाव सुचवले होते. परंतु अहमदनगर महानगरपालिकाचे कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे सध्या प्रशासक नेमले असल्याने आयुक्तांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कोणालाही विश्वासात न घेता अहमदनगर नामांतरांचा ठराव मंजूर करून घेतला. आयुक्तांनी अहमदनगर नामांतरासाठी जे नाव नागरिकांनी सुचवले होते त्यावर कोणतीही चर्चा केलेली दिसत नाही. याचाच अर्थ आयुक्तांनी आपले पदाचा दुरुपयोग करून विश्वासघात केला आहे. आयुक्तांना अहमदनगर नामांतराचा ठराव मंजूर करण्याचा अधिकार होता की नव्हता हे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत तसेच लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कोणत्याही नागरिकांसोबत चर्चा न करता नामांतराचा ठराव मंजूर करण्याची आयुक्तांनी घाई का केली? कोणाचा राजकीय दबाव होता की त्यांनी तातडीने ठराव मंजूर करून घेतले? जी सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वजांचे नाव देण्यासाठी सक्षम नाही ती सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाने फक्त नागरिकांकडून मत घेणे व आपला घाणेरडा राजकारण करण्यात रस असल्याचे दिसते.

या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज व त्यांचे तत्त्वाशी काही एकनिष्ठा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खरंच महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज व महाराजांचा एकनिष्ठ असेल आणि सरकारने अहमदनगरचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाच असेल तर अहमदनगरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले व चुलते शरीफजी राजे भोसले यांचे नावाने शहाशरीफ नगर असे द्यावे अन्यथा हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज आणि तत्वा विरोधी असल्याचे स्पष्ट होईल, असे निवेदन गृहमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांनी दिली. निवेदनाच्या प्रती, मुख्यमंत्री, अल्पसंख्याक आयोग, जिल्हा पोलीस अधीक्षक, खा.असदुद्दीन ओवैसी, खा. इम्तियाज जलील, डॉ गफ्फार कादरी यांना पाठविण्यात आल्या आहेत.