सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नगर उपकेंद्राच्या बाबुर्डी घुमट येथील इमारतीचे ३ मार्च रोजी उद्‌घाटन

0
79

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अहमदनगर उपकेंद्राच्या नगर तालुयातील बाबुर्डी घुमट येथील नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ रविवार होणार असून, तयारीची पाहणी आयोजन समितीचे अध्यक्ष डॉटर राजेंद्र विखे पाटील यांनी केली. समवेत सचिन गोरडे पाटील, डॉ. नंदकुमार सोमवंशी, डॉ. शिवप्रसाद घालमे आदी.

नगर- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अहमदनगर उपकेंद्राच्या नगर तालुयातील बाबुर्डी घुमट येथील नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी राहणार असून खासदार डॉ.सुजय विखे पाटील, प्र-कुलगुरू, डॉ.पराग काळकर, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, डॉ.राजेंद्र विखे पाटील, अध्यक्ष, आयोजन समिती, डॉ.विजय खरे, प्रभारी कुलसचिव यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती उपकेंद्राचे संचालक डॉ.नंदकुमार सोमवंशी यांनी दिली. आयोजन समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत अध्यक्ष डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनी उपकेंद्राची सविस्तर माहिती दिली. यावेळी सचिन गोरडे पाटील, डॉ. नंदकुमार सोमवंशी, नगर केंद्राचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवप्रसाद घालमे उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अहमदनगर उपकेंद्राची बाबुर्डी घुमट येथे एकूण ८३ एकर जमीन आहे तर येथील नूतन इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ १८,००० स्के.फु. आहे या उपकेंद्रामार्फत परीक्षेच्या केंद्रीय मूल्यमापन कार्यक्रमासाठी जिल्हयातील महाविद्यालयांकडून आलेल्या उत्तर पुस्तिकांचे संकलन करून त्वरित विद्यापीठाकडे पाठविणे, विद्यापीठातर्फे राबविण्यात येणार्‍या नविन योजना व ध्येयधोरणे जिल्हयातील महाविद्यालयांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा, शिबिरे, चर्चासत्रे, प्रशिक्षण वर्ग इ. चे आयोजन करणे, विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे. विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी सॉफ्ट स्कील्ससारखे शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण, अहमदनगर उपकेंद्र येथे परीक्षा विभागाकडून आलेले निकाल, परीक्षाविषयक स्टेशनरी इ. जिल्हयातील महाविद्यालयांना वितरण करणे,जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये/ परिसंस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परिक्षाविषयक व शैक्षणिक समस्यांचे निराकरण करणे आदी सुविधा मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या विविध शैक्षणिक कामासंदर्भात विद्यापीठात जाउन वेळ व पैसा खर्च होउ नये यासाठी उपकेंद्रात विद्यार्थी सुविधा केंद्र हा कक्ष सुरु करण्यात आलेला असुन या कक्षामार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. उदा. विद्यार्थ्यांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, विविध प्रमाणपत्रांचे अर्ज स्विकारणे, परीक्षेच्या निकाल पत्रातील दुरूस्ती संदर्भात अर्ज स्विकारणे, सुधारीत निकाल पत्र देणे तसेच विद्यापीठात असणार्‍या विविध शैक्षणिक कोर्सेसची माहिती या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दिली जाते. या चालू शैक्षणिक वर्षात ४ वर्ष डाटा सायन्स कोर्सला मान्यता मिळालेली असुन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात हा कोर्स सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर ए.आय, इंडस्ट्रीयल ओरिएंटेड कोर्सेस, मॅनेजमेंट रिलेटेड कोर्सेस सुरु करणे प्रस्तावित आहे. सध्याच्या १८,००० स्के. फु. व्यतीरिक्त २७,००० स्के. फु. याच इमारतीच्या वर बांधकाम मंजुर होउन लगेच सुरुवात होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थीनींसाठी वसतीगृह नियोजीत आहे. या सर्व गोष्टींचा फायदा भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे. भविष्यात विद्यापीठ उपकेंद्राचे कामकाज अधिक गतिमान करणे व विद्यार्थ्यांना विद्यापीठातील सर्व सोई सुविधांचा लाभ विद्यापीठ उपकेंद्रात उपलब्ध करुन देऊन विद्यापीठावरील कामाचा ताण कमी करण्याचा मानस आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अहमदनगर उपकेंद्र व उच्च तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन यांचेतर्फे १००० विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन प्लेसमेंट करणार आहोत. तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरु करण्यात येणार असुन त्यासाठी प्रत्येकी ३० कोटींचे नियोजन आहे. कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभा सदस्य यांनी केले आहे.