नगरच्या पोलिस ठाण्यातच धक्काबुक्की; दोघांवर गुन्हा दाखल

0
29

नगर – तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या दोघांनी पोलीस ठाणे अंमलदार यांच्या समोरच एकमेकांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. बुधवारी (दि. २८) दुपारी साडेबाराच्या सुमारास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ही घटना घडली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार अमोल आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. वसीम मेहबूब सय्यद (वय ४१,रा. असा मस्जीद जवळ, बिलाल पार्क, आलमगीर, भिंगार) व शाकीर अब्दुल गनी शेख (वय ३५,रा. आलमगीर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वसीम व शाकीर यांच्यात वाद झाल्याने ते दोघे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तक्रार देण्यासाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाणे अंमलदार यांच्या कक्षात पोलीस अंमलदार यांच्यासमोरच त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. सदरचा प्रकार पोलिसांसमोर घडत असताना त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान पोलीस ठाणे अंमलदार कक्षात एकमेकांना धक्काबुक्की करणार्‍या वसीम व शाकीर यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरोधात भादंवि कलम १६० नसार गुन्हा दाखल केला आहे.