१५ अधिकारी नव्याने जिल्ह्यात आले बदलून; विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश
नगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी २ टप्प्यात नाशिक परिक्षेत्रातील पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झालेल्या असून पुन्हा ५९ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील १५ अधिकार्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी १५ अधिकारी जिल्ह्यात बदलून आले आहेत. नगरमधील पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी व विजय करे यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे. नाशिक ग्रामीण मधून रविंद्र मगर व नंदुरबार येथून भरत जाधव नगरमध्ये आले आहेत. जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, रामचंद्र कर्पे, युवराज आठरे यांची नाशिक ग्रामीणला, राजु लोखंडे, गणेश वारुळे यांची नंदुरबारला तर महेश येसेकर यांची जळगाव येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी नाशिक ग्रामीण येथून शिवाजी तांबे, एकनाथ ढोबळे, मयूर भामरे, वर्षाताई जाधव हे ४ अधिकारी नगर जिल्ह्यात आले आहेत. नगर जिल्ह्यातील ७ पोलिस उपनिरीक्षकांच्या नाशिक ग्रामीणला बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये गजेंद्र इंगळे, अश्विनी मोरे, युवराज चव्हाण, योगेश चाहेर, श्रीकांत डांगे, शैलेंद्र जावळे, अनिल भारती यांचा समावेश आहे. तर ९ जण जिल्ह्यात बदलून आले आहेत. त्यात कैलास कपिले, अश्विनी टिळे, अशोक मोकळ, पांडुरंग कावळे, रमेश पाटील, विक्रांत कचरे, विनोद परदेशी, महेश शिंदे हे ८ अधिकारी नाशिक ग्रामीण येथून बदलून आले आहेत. तर जयेश गांगुर्डे हे धुळे येथून आले आहेत. जिल्ह्यात बदलून आलेल्या २४ अधिकार्यांना पदस्थापना या बदल्यांच्या ३ टप्प्यात जिल्ह्यात बदलून आलेल्या २४ अधिकार्यांना पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पदस्थापना दिल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे पोलिस निरीक्षक दौलत जाधव- भरोसा सेल, अरविंद जोंधळे- दहशतवाद विरोधी शाखा, रविंद्र मगर – आर्थिक गुन्हे शाखा, भरत जाधव – जिल्हा विशेष शाखा, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड – श्रीगोंदा पोलिस ठाणे, संदीप वसावे – कर्जत पोलिस ठाणे, देवेंद्र शिंदे – राहुरी पोलिस ठाणे, महेश माळी – शेवगाव पोलिस ठाणे, शिवाजी तांबे – पाथर्डी पोलिस ठाणे, एकनाथ ढोबळे – वाचक अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर, मयूर भामरे – कोपरगाव पोलिस ठाणे, वर्षाताई जाधव – जामखेड पोलिस ठाणे, पोलिस उपनिरीक्षक आण्णासाहेब परदेशी – शहर वाहतूक शाखा, युवराज अहिरे – पारनेर पोलिस ठाणे, कैलास कपिले – कोतवाली पोलिस ठाणे, अश्विनी टिळे – शिर्डी पोलिस ठाणे, अशोक मोकळ – संगमनेर तालुका पोलिस ठाणे, पांडुरंग कावळे – राजूर पोलिस ठाणे, रमेश पाटील – संगमनेर शहर पोलिस ठाणे, विक्रांत कचरे – वाहतूक शाखा, शिर्डी, विनोद परदेशी – एमआयडीसी पोलिस ठाणे, महेश शिंदे – जिल्हा विशेष शाखा, जयेश गांगुर्डे – नगर तालुका पोलिस ठाणे, शैलेश पाटील – तोफखाना पोलिस ठाणे.