खा. सुजय विखे यांनी मोठा निधी उपलब्ध करुन दिल्याने प्रलंबित कामे मार्गी लागणार

0
48

नगर – महानगरपालिकेच्या बोल्हेगावं येथील प्रभाग क्रमांक सात मधील गणेश चौक ते बोल्हेगाव व आंबेडकर चौक ते गांधीनगर रस्त्यासाठी नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे यांनी दिली. यावेळी लोभाजी कातोरे, भारत वामन पाटील, वसंतराव सूर्यवंशी आदि उपस्थित होते. यावेळी खा. सुजय विखे व ना. राधाकृष्ण विखे यांचे निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी आकाश कातोरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून बोल्हेगाव येथील गणेश चौक ते बोल्हेगाव रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती, याबाबत महापालिका प्रशासनाकडे या प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी वेळोवेळी आवाज उठवला, निवेदने दिली. तसेच ग्रामस्थांच्यावतीने देखील रास्ता रोको करण्यात आला. परंतु महापालिकेकडून केवळ आश्वासन मिळत गेली, पण रस्त्याचे काम काही झाले नाही. त्यानंतर खा. सुजय विखे यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली यावर विखे यांनी तात्काळ गणेश चौक ते बोल्हेगावपर्यंत रस्त्यासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये पर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच आंबेडकर चौक ते गांधीनगर या भागातील रस्त्या करिता दोन कोटी पस्तीस लाखाचा भरिव निधी उपलब्ध करून दिला. तसेच प्रभागातील अंतर्गत छोट्या-मोठ्या शिवसेनेचे स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्या निधीतून हा रस्ता तयार करण्यात आला होता. तर पुन्हा या रस्त्याकडे शहरातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही तसेच शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांना याच प्रभागातील शिवसेनेच्या तीनही नगरसेवकांनी निवडणुकीमध्ये मतदान केले. या महापौरांना थोडीदेखील किव आली नाही की आपल्याला ज्या शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी मतदान केले. त्यांच्या प्रभागातील रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे. आणि ग्रामविकास खात्यातून एकनाथ शिंदे यांनी जो निधी दिला, त्या निधीपैकी काही निधी या प्रभागासाठी वापरावा असे देखील त्यांना वाटले नाही. त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ दिसला निवडणुकीमध्ये पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांनी हा सर्व निधी प्रशासनाला आयुक्तांना हाताशी धरून सर्व निधी त्यांच्या प्रभागासाठी पळवला असल्याचे आकाश कातोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.