अयोध्या आणि श्रीनगर येथे बांधणार महाराष्ट्र भवन

0
25

शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण करणार; महाराष्ट्र ड्रोन मिशन राबवण्यास मान्यता; राज्याच्या अर्थसंकल्पात ७७ कोटींची तरतूद; अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीनगर जम्मू काश्मीर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी त्या त्या राज्य सरकारने अगदी मोयाच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून घेतल्या आहेत. यासाठी ७७ कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी या योजनेत मुलीला टप्प्या-टप्याने एक लाख एक हजार रुपये मिळतील, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या योजनेची घोषणा आधीच करण्यात आली होती. या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. १० शहरात पिंक रिक्षा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. महाराष्ट्र ड्रोन मिशन राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी २६८ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. सहा ठिकाणी त्यासाठी केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. ५० ठिकाणी थिम पार्क तयार करण्यात येत असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टाीने जागांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पवार यांनी दिली. शिवकालीन ३२ गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. औंधमध्ये एम्स सुरु करण्यात येणार असल्याची घोषणास अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. आदिवासी विकास विभागास १५ हजार कोटींचा निधी सार्थी, बार्टी, महाज्योती या सारख्या संस्थांना देण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती आणि इतर सर्व योजनांत एकसंघता आणण्यासाठी धोरण तयार करण्यात येत आहे. बार्टीच्या धर्तीवर आर्टी सुरु करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. ऊसतोड कामगारांसाठी उपघात विमा योजना सुरु करण्यात येणार धनगर समाजाच्या उन्नसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. मदरसा अनुदानात दोन लाखांवरुन दहा लाखांपर्यंत वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. राज्यात गुंतवणूक वाढण्यावर भर देण्यात येत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. राज्याला आठ हजार कोटींचा जीएसटी परतावा मिळाला असल्याची माहिती अटल सेतू आणि कोस्टल रोडला जोडण्यासाठी दोन बोगद्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. जालना ते नांदेड महामार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. बुलेट ट्रेनचे भुसंवादन जवळपास पूर्ण झाले आहे. नियोजित रस्त्यांसाठी सहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. ११ गड किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ५४८ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूरमधील मिहानसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. राज्यात १८ लघु उद्योग संकुल उभारण्यात येणार आहेत. हर घर नळ योजनेत एक कोटी नळ जोडणीचे उद्दीष्ट तीन हजार कोटींचा निधी पाणी पुरवठा विभागाला देण्यात आला. दहा हजार हेटर क्षेनावर बांबुची लागवाड करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाला नऊ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. वन विभागास दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. ऊर्जा विभागाला अकरा हजार कोटींचा निधी सात हजार मेगाव्हॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. शेतकर्‍यांना एक लाख सौरपंपाचे वाटप करण्यात येणार. नवी मुंबई विमानतळ पुढील वर्षीपर्यंत सेवा सुरू करण्याची अपेक्षा. राज्यातील चाळीस तालुयात दुष्काळाची स्थिती असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.