नगर शहरातील मारवाडी, गुजराती व्यक्तींच्या जमिनींवर बेकायदेशीर ताबा मारण्याचे प्रकार

0
44

ताबेखोरांविरोधात गुन्हे दाखल करून झोपडपट्टीदादाची कारवाई करा : गृहमंत्र्यांकडे मागणी

नगर – अहमदनगर शहरातील उपनगरांमध्ये मारवाडी, गुजराती समाजातील व्यक्तींच्या जमिनी शोधून त्याच्यावर बेकायदेशीर ताबा मारणारे विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे सावेडी व केडगाव उपनगर या भागामध्ये शहराची हद्दवाढ झालेली आहे. या विकासात बिल्डर व जमिन मालकांचे मोठे योगदान आहे असे असताना सावेडी उपनगरामध्ये मारवाडी व गुजराथी समाजाच्या व्यक्तींच्या जमिन पाहुन राजकीय आशिर्वादाने पोसलेले बेकायदेशीरपणे ताबा मारुन खंडणी मागण्याचा प्रकार करतात. पोलिस प्रशासनही या प्रकाराकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करीत आहे. पिडीत व्यक्तींना पोलिसांकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने सदरचा विषय दिवाणी स्वरुपाचा असल्याने आम्ही मदत करु शकत नाही असे उत्तर पोलिसांकडून मिळत असल्याने पिडीत व्यक्ती अन्यायाविरोधात उघडपणे दाद मागण्याचे धाडस करीत नाही. नाईलाजास्तव जमिन कमी किंमतीत राजकीय मंडळींना विकावी लागते. नाहीतर संबधीत गुंडाना खंडणी देऊन त्याची कोणतीही वाच्यता न करता तडजोड करावी लागते हे ताबे मारणारी टोळी कोणाला तरी कायदेशीर उभे करुन न्यायालयामध्ये खोटे दावे दाखल करुन सदर जमिनीचे लेटीकेशन तयार करुन ब्लॅकमेलींग करीत आहे. असेच प्रकार केडगांव उपनगरात व आरणगांव रोड या ठिकाणी सुध्दा राजरोस पणे सुरु आहे.

अरणगांव रोड वर काही समाजाचे व्यक्ती संघटीत टोळी तयार करुन मोकळ्या जमिनीवर ताबा मारलेला आहे. संबधीत भुखंडधारकास सदरचा ताबा सोडण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात स्थानिक पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार करुनही तक्रारकर्त्यास न्याय मिळत नाही. उलट या ताबे मारणार्‍या टोळीस पाठीशी घालण्यात येत आहे. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून त्यामुळे करोडो रुपयांची जमिनी खरेदी घेऊन बेकायदेशीर ताबा मारण्याच्या प्रकारामुळे व्यापारी वर्ग भयभीत झालेला आहे. ते जमिनीत गुंतवणुक करण्यास धाडस करीत नाही या विकासाच्या दृष्टीकोनातुन हानिकारक आहे. सदर प्रकरणाची वरीष्ठ स्तरावरुन सखोल चौकशी होवून बेकायदेशीर ताबे मारणार्‍यांच्या विरोधात महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगारी, धोकादायक व्यक्ती प्रतिबंध अधिनियम व भारतीय दंड विधानसंहिता अन्वये गुन्हा दाखल होवून प्रतिबंध करण्यात यावे त्यांचे राजकीय गॉड फादर यांनाही सहआरोपी करण्यात यावे. या गुन्हेगारी पार्श्वभुमीकडे दुर्लक्ष करणारे पोलिस अधिकार्‍या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेख शाकीर अब्दुल सत्तार यांनी राज्याचे गृहमंत्री, अपर मुख्य गृहसचिव, पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांच्याकडे केलेली आहे.