राजकीय झुंज दिल्याशिवाय पर्याय नाही : दिशा शेख

0
31

वंचित बहुजन युवा आघाडीचा संवाद मेळावा उत्साहात

नगर – राजकीय झुंज दिल्याशिवाय पर्याय नाही मतदार व मतदान कोणाच्या एकट्या बापाची जागीर नाही. एसी समाजातील उमेदवाराला ओपनची जागा देणारा फक्त वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष आहे. रस्त्यावर भीक मागणार्‍या माणसांना प्रकाश आंबेडकर यांनी खासदार केले. जेव्हा जेव्हा व्यक्ती स्वतंत्र्यावर गदा येते तेव्हा प्रकाश आंबेडकर छाती ठोक पणे उभे राहतात. कोल्हापूर येथे जाऊन मराठा समाजाला पाठिंबा देण्याचे काम केले. भाजपमध्ये गेलेले लोक काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करत होते. आता भाजपमध्ये जाऊन भाजपचे काम करत आहेत, पण भाजपला अंगावर घेण्याचे काम फक्त प्रकाश आंबेडकर हे करत आहे, असे दिशा पिंकी शेख म्हणाल्या. वंचित बहुजन युवा आघाडीचा संवाद मेळावा निलेश गायकवाड यांनी श्रीगोंदे येथे आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी पदाधिकारी व महिला पुरुष उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यात भटकी मुक्त आदिवासी लोकांचे काम करणे सोपे नाही कारण हा धन दांडग्यांचा जिल्हा आहे. त्यामुळे खिशातून पैसे घालून काम करावे लागते. आपण ज्या समाजात काम करतो त्या समाजाला वंचित बहुजन आघाडीची भूमिका सांगितली पाहिजे. येड्यांसोबत तर कोणीही काम करते पण गुणवंत बुद्धिमान असणार्‍या लोकांसोबत काम केले शत्रु व मित्र ओळखता आले नाही तर तुम्ही राजकारण आणि समाजकारण करू शकत नाहीत आमच्यासारख्या वंचितांना या स्टेजवर येऊन भाषण करण्याची संधी केवळ प्रकाश आंबेडकरांनी दिली.

कुठेही बलात्कार, हत्याकांड झाले तरी इतर नेते डोकून सुद्धा पाहत नाहीत आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे व हुकूमशाही थांबवावी असे आवाहन अरुण जाधव यांनी केले. पक्षात काम करत असताना प्रोटोकॉल पाहूनच काम करावे कोणीही गट तट करू नयेत आपापसातील भेदभाव बाजूला ठेवून पक्षासाठी काम करावे जास्तीत जास्त सदस्य नोंदवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करायचे आहे असे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे म्हणाले. सर्वांनी सहकार्य केल्यामुळेच आजचा हा संवाद मेळावा यशस्वी झाला असे युवक जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड म्हणाले. या कार्यक्रमात अ‍ॅड. महेंद्र शिंदे, महेश पवार, कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नेटके सर यांनी केले. आभार आयोजक निलेश गायकवाड यांनी मानले. हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा उपाध्यक्ष सचिन घोडके, नाना सांगळे, नितीन जावळे, भीमराव घोडके, यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, राज्य समन्वयक अरुण जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष गलांडे, जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, युवा जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, ऊसतोड कामगार मुकादम संघटना जिल्हाध्यक्ष दादासाहेब पाडळे, शहराध्यक्ष हनिफ शेख व पदाधिकारी उपस्थित होते.