शिवजयंतीच्या पारंपरिक कार्यक्रमातून संस्कृती व परंपरा जोपासण्याचे काम होते

0
24

नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व जाती-धर्माचे नागरिक एकत्र येऊन उत्साहात विविध कार्यक्रम करत असतात या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची देवाण-घेवाण होत असते, नवसहकार युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आपली संस्कृती व परंपरा जोपासण्याचे काम होत असते, संभाजी पवार हे रेल्वे स्टेशन परिसरात वर्षभर विविध उपक्रम राबवत नागरिकांना एकत्र आणण्याचे काम करतात, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. रेल्वे स्टेशन येथे नवसहकार युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी फुलांची आकर्षक सजावट देखावा सादर करण्यात आला.

रेल्वे स्टेशन येथे नवसहकार युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकर्षक देखावा 

मूर्तिकार संदीप गोसके यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व प्रभू श्रीराम यांचे पुतळे तयार करून त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला महापुरुषांचा इतिहास सांगण्याचे काम केले. याबद्दल नवसहकार युवा प्रतिष्ठानच्या वतीने संदीप गोसके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संपत बारस्कर, माजी नगरसेविका आशा पवार, संभाजी पवार, विजय गव्हाळे, दत्तात्रय खेरे, लक्ष्मण सोनाळे, दिपक लोढे, अरुण नाणेकर, माजी नगरसेवक मनोज कोतकर, मयुर बांगरे, अध्यक्ष मयुर पवार, प्रसाद जमदाडे, वैभव देविकर, प्रसाद चनेदिया, अजय पवार, शरद दळवी, अमोल गाडे, सौरभ पवार, यमुना पवार, किसनराव लोटके, केशव खानदेशे, अशोक आगरकर, अजय पवार, मंगल कचरे, नाना दळवी, प्रविण आव्हाड, दर्शन चनेदिया, योगेश सोबले, रावसाहेब दळवी, आर. टी. शर्मा, शिवाजी ससे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राधमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका व परिसरातील नागरिक उपस्थित होते.