नागरदेवळे पाठोपाठ सारसनगरमध्येही तलवार घेवून फिरणाऱ्याला पकडले

0
23

नगर – नागरदेवळे गावात तलवार घेवून फिरत दहशत निर्माण करणार्‍याला पकडल्याची घटना ताजी असताना मंगळवारी (दि.१३) पुन्हा भिंगार कॅम्प पोलीसांनी सारसनगर- मध्येही तलवार घेवून फिरणार्‍याला पकडले आहे. भगवान उर्फ शुभम रघुनाथ गोल्हार (वय २१, रा. त्रिमुर्ती चौक, सारसनगर) असे या आरोपीचे नाव आहे. भिंगार पोलीस स्टेशनचे स.पो. नि. योगेश राजगुरु यांना मंगळवारी (दि.१३) गोपनिय माहीती मिळाली की, त्रिमुर्ती चौक, सारसनगर भागात एक इसम हातात धारदार तलवार अवैध्यरित्या घेऊन दहशत करीत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने स.पो.नि. राजगुरु यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांना त्या ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन भगवान उर्फ शुभम रघुनाथ गोल्हार हा दहशत करित असताना त्याच्या हातातील धारदार तलवार शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पकडले. त्याच्या विरुध्द कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स.पो.नि. योगेश राजगुरु, स.फौ. रेवननाथ दहिफळे, पो.हे.कॉ. दिपक शिंदे, मिसाळ, संदिप घोडके, पो.कॉ.समीर शेख, पो.कॉ. थोरात, पो.कॉ.अमोल आव्हाड, चालक.पो.कॉ.लगड यांनी केली आहे.