प्रत्येकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असेच श्रीराम मंदिर निर्माण झाले आहे : भागवत कुरधने

0
63

रामभक्त भागवत कुरधने यांनी घडविले १०८ तरुणांना स्व:खर्चाने आयोध्या येथील श्रीराम मंदिराचे दर्शन

नगर – आयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांचे मंदिर निर्माण होऊन, त्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली, ही समस्त हिंदू समाजासाठी मोठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्यासाठी व नगरमधील रामभक्तांना आपण आयोध्यातील प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन घडवून आणले. त्याचबरोबर हिंदू धर्मातील इतर धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्याचे पुण्यकर्म केले आहे. प्रत्येकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असेच श्रीराम मंदिर निर्माण झाले आहे. श्रीरामच्या दर्शनाने सर्वचजण धन्य झाले आहेत, आम्हास ही सेवा करण्याची संधी मिळाली, हे आम्ही आमचे भाग्य समजतो, असे उद्गार रामभक्त भागवत कुरधने यांनी काढले. रामभक्त भागवत कुरधने यांनी १०८ तरुणांना स्वखर्चाने अयोध्या येथील श्रीराम मंदीराचे दर्शन घडून आणले. त्याचबरोबर २१ दाम्पत्यांच्या हस्ते गंगापुजन करुन महाप्रसाद आयोजन करण्यात आले. याबद्दल त्यांचा आयोध्या ग्रुपच्यावतीनेइलाक्षी शो-रुम मागील शिवालाय बंगला येथे भव्य श्रीरामच्या मुर्तीची महाआरती करुन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी विशाल खैरे, मतकर मामा, दिनेश जोशी, विजय फिरोदे, सौ.स्नेहा जोशी, सौ. सुरेखा खैरे, विजय गायकवाड, यशवंत खैरे, विजय घासे, पंडीत खुडे, देविदास मेहेत्रे, नितीन मेहेत्रे, प्रविण भापकर, रोहन गोंटे, सागर ढुमने, महेश चिंतामणी, सिद्धांत झेंडे, भैय्या लोखंडे, पिनु वणवे, स्वप्निल गवळी, दत्ता औशिकर, शंकर पंडीत, युवराज पाचरणे, सागर वाळके, सतिश ढवळे, वैभव दळवी, राहुल पाखरे, प्रतिक सुपेकर, प्रशांत हातरुणकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी विशाल खैरे म्हणाले, भागवत कुरधने हे खर्‍ या अर्थाने रामभक्त आहेत. स्व:खर्चाने तरुणांना आयोध्येतील प्रभुचंद्रांचे दर्शन घडवून आणले ही कौतुकास्पद बाब आहे. या उपक्रमांमुळे तरुणांची इच्छापूर्ती केली आहे. आयोध्या ग्रुपच्यावतीने सत्कार करुन त्यांना धन्यवाद दिले असल्याचे सांगितले.