जैन सोशल फेडरेशनचा समर्पित सेवाभाव रूग्णांसाठी वरदान : सुधीप अग्रवाल.

0
34

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये श्रीजी ग्रुपच्या सहकार्याने मोफत बालरोग तपासणी शिबीर

नगर – आरोग्य क्षेत्रात समर्पित सेवाभाव ठेवून जैन सोशल फेडरेशन आनंदऋषीजी हॉस्पिटलमार्फत रूग्णसेवा करीत आहे. आचार्यश्रींच्या कृपाशिर्वादाने याठिकाणी अतिशय माफक दरात रूग्णांना उच्च दर्जाचे उपचार मिळतात. ते ठणठणीत बरे होवून हसतमुखाने आपल्या घरी जातात. मानवसेवेच्या या कार्यात हातभार लावताना आम्हाला नेहमीच आनंद होतो. हॉस्पिटलमध्ये सुरु असलेले सेवाकार्य रूग्णांसाठी वरदान आहे, असे प्रतिपादन श्रीजी ग्रुपचे सुधीप अग्रवाल यांनी केले. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित मोफत बालरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन श्रीजी ग्रुपचे चेअरमन दिनेश अग्रवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी सुधीप अग्रवाल बोलत होते. या प्रसंगी दिनेश अग्रवाल, सुनिताताई अग्रवाल, समिता अग्रवाल, सागर अग्रवाल, अनिशा अग्रवाल, सैरेश अग्रवाल, नायरा अग्रवाल, समयरा अग्रवाल, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, निखिलेंद्र लोढा, डॉ.वसंत कटारिया, डॉ.प्रकाश कांकरिया, प्रकाश छल्लाणी, सतीश लोढा, डॉ.आशिष भंडारी, तज्ज्ञ डॉ. श्रेयस सुरपुरे, डॉ.रुपेश सिकची, डॉ.सोनाली कणसे, डॉ.वैभवी वंजारे आदी उपस्थित होते. यावेळी अग्रवाल परिवारातर्फे हॉस्पिटलच्या बालरोग विभागाला मॉनिटर, सिरींज पंप व व्हेंटीलेटर मशीन भेट देण्यात आले. निखिलेंद्र लोढा यांनी स्वागत करताना सांगितले, अग्रवाल परिवाराने बालरूग्णांसाठी अत्याधुनिक मशीन देत आरोग्य सेवेत भर टाकली आहे.

सिरींज पंपमुळे रूग्णांना योग्य मात्रेत इंजेशन देताना मदत होते, मॉनिटरमुळे हृदयाची गती, शरीरातील ऑसिजनची लेव्हल कळते तर व्हेंटीलेटरमुळे अत्यवस्थ रूग्णास कृत्रिम श्वाच्छोश्वास देता येतो. संतोष बोथरा यांनी प्रास्ताविकात सांगितले की, नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे अद्ययावत एनआयसीयु आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील बालरोग विभागात सुरु केले आहे. त्याचा बालरूग्णांना लाभ होत आहे. याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र रूग्णांवर संपूर्ण मोफत उपचारही केले जातात. मोठ्या महानगरांत मिळणार्‍या आरोग्य सुविधा, अद्ययावत आधुनिक वैद्यकीय मशीनरी याठिकाणी आहेत. दिनेश अग्रवाल परिवाराने नेहमीच हॉस्पिटलच्या सेवाकार्यात योगदान दिले आहे. बालरोग विभागासाठीही त्यांनी मदतीचा हात दिला. समाजातील अंतिम घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा नेण्याचा जैन सोशल फेडरेशनचा प्रयत्न आहे. नेत्रालयामार्फत महिन्याला जवळपास २ हजारपेक्षा अधिक नेत्रशस्त्रक्रिया करण्यात येतात.

नगर, बीड येथे २५ व्हिजन सेंटर कार्यरत आहेत. तिथे डोळ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे डायलेसिस सेंटर हॉस्पिटलमध्ये आहे. याचा रूग्णांना चांगला लाभ होत आहे. डॉ.श्रेयस सुरपुरे, डॉ.रुपेश सिकची यांनी बालरोग विभागाची माहिती देताना सांगितले, २६ बेडचा अद्ययावत एनआयसीयू याठिकाणी आहे. नवजात बाळाच्या श्वासोच्छवासाच्या त्रासावर उपचार, बालदमा ए.आर.डी. एस.(श्वसन दाह), नवजात बालकांच्या कावीळीसाठी फोटो थेरपी व रक्त बदलण्याची सुविधा, अनुवंशिक आजार व जन्मजात आजारांचे निदान व उपचार मार्गदर्शन, बालदमा तसेच लहान मुलांचे टू डी इको, एस रे, पॅथोलॉजी लॅब २४ तास उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मशीन्समुळे विविध तपासण्यात अचूकता येण्यास मदत होते. २४ तास तज्ज्ञ डॉटर्स बालरोग विभागात कार्यरत आहेत. दर शनिवारी मोफत ओपीडी सेवा उपलब्ध असून सोमवार ते शुक्रवार ओपीडी सेवेसाठी ५० रुपये आकारले जातात. डॉ. आशिष भंडारी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश छल्लाणी यांनी आभार मानले. या शिबिरात ८९ बालरुग्णांची तपासणी करण्यात आली.